बहुभाषिक नाट्य महोत्सवात मराठी आणि सिंधी नाटकांची जुगलबंदी

06 Nov 2025 21:22:37
नागपूर,
Multilingual Drama Festival : कलासागर संस्थेच्या वतीने आयोजित २०व्या बहुभाषिक एकांकिका नाट्य महोत्सवात बुधवारी सादर झालेल्या मराठी आणि सिंधी नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विविध भाषांतील रंगकृतींचा मेळ साधणाऱ्या या महोत्सवाला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. दिवसातील पहिल्या सत्रात वत्सल क्रिएशन सांस्कृतिक मंडळ प्रस्तुत आणि श्याम आसकरकर लिखित-दिग्दर्शित ‘रिसर्च अँड एनालिसीस विंग’ हे मराठी नाटक रंगमंचावर आले.
 
 
NGP
 
 
 
नाटकात आकाश दुधनकर, नमिता देशपांडे आणि श्याम आसकरकर यांनी भूमिका साकारल्या. तांत्रिक बाजू मनोहर माळोदे, अमित कुबडे, दीपक कट्यारमल, प्रणव चवंडके, शार्दुल मोहरल आणि श्रद्धा गुंडे यांनी समर्थपणे सांभाळली. यानंतर सिंधुडी युथ विंग प्रस्तुत ‘असीं स्वागत कंदा आहियूं’ या सिंधी नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले. नाटकाचे दिग्दर्शन हरीश माईदासानी यांनी केले असून, भूमिकेत दिनेश केवलरामानी, गुरमुख मोटवानी, हरीश माईदासानी, तुलसी सेतिया, ओमप्रकाश तेहलियानी, पिंकी मंगलानी, परमानंद कुकरेजा आणि चंदू गोपानी झळकले. तांत्रिक बाजू ओमप्रकाश तेहलियानी आणि हरीश माईदासानी यांनी सांभाळली. यावेळी निवृत्त कर्नल यू. के. चेंबत, व्यंकटेश फोरेक्स सर्व्हिसेसचे मनीष वानखेडे, बाबा नानक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीरेखा संजीवन नायर, कलासागर संस्थेचे अध्यक्ष पद्म नायर उपस्थित होते. या बहुभाषिक नाट्यप्रवाहातून नागपूरातील रंगभूमीवर सांस्कृतिक वैविध्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
 
Powered By Sangraha 9.0