मुंबई लोकल अपघात: दोघांचा मृत्यू, तीन जखमी, कारण आंदोलन?

06 Nov 2025 20:41:21
मुंबई, 
Mumbai local accident : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने चार प्रवाशांना उडवलं आणि त्यात दोघांचा मृत्यू, तीन जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी झाले आहेत. त्या चार प्रवाशांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
 
 
mumbai local
 
 
 
रेल्वे प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई काय म्हणाले?
 
 
पिक अवर मध्ये ट्रेन लेट झाल्या तर गर्दी प्रचंड वाढते. ही भीती मी मगाशीच व्यक्त केली होती. मुंब्रा येथील अपघात झाला होता त्याची कारणं काय याचा अभ्यास करुन अहवाल देणं आवश्यक होतं. पण तसं घडलं नाही. महाराष्ट्र पोलिसांनी सखोल अभ्यास करुन योग्य अहवाल तयार केला होता. प्रवाशांचे मृत्यू होत आहेत ते थांबले पाहिजेत अशीच आमची मागणी आहे. CRMS ने जे आंदोलन अचानकपणे केलं ते चुकीचं होतं. प्रवाशांचे हाल होत आहेत आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले असं सिद्धेश देसाई यांनी म्हटलं आहे.
 
 
 
 
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी काय म्हणाले?
 
 
सँडहर्स्ट रोड स्टेशनवर काही प्रवासी चालले होते. त्यांना अंबरनाथ फास्ट ट्रेनने धडक दिली. आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तिघांना धडक लागली आहे. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील याची काळजी आम्ही घेत आहोत. असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. पीटीआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0