जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

06 Nov 2025 19:34:20
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
elections : जिल्ह्यातील 9 नगरपरिषद, 2 नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम-2025 जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
 
 

klk 
 
 
 
जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर, आर्णी व नगरपंचायत ढाणकी या ठिकाणांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे. प्रत्यक्ष मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे.
 
 
या सार्वत्रिक निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइट व सूचना फलकावर तसेच संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या वेबसाइट व सूचना फलकावर 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
 
 
यवतमाळसाठी उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, तहसीलदार योगेश देशमुख, पुसदसाठी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरबर. वणीसाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मुख्याधिकारी सचिन गाडे. उमरखेडसाठी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, मुख्याधिकारी अजय कुरवाडे.
 
 
दिग्रससाठी उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, दारव्हा तहसीलदार मयुर राऊत, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, पांढरकवडासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन, मुख्याधिकारी शशीकांत बाबर. तहसीलदार राजेंद्र इंगळे, घाटंजीसाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटिल, तहसीलदार विजय साळवे, मुख्याधिकारी राजू घोडके. नेरसाठी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, बाभूळगाव तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, मुख्याधिकारी रविंद्र राऊत, आर्णी ढाणकीसाठी तहसीलदार राजू सुरडकर, मुख्याधिकारी अरुण मोकळ या अधिकाèयांची नेमणूक करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0