“नर्मदा परिक्रमा आत्मोद्धारासाठी हवी” — डॉ. श्रीरंग दिवाण

06 Nov 2025 14:18:02
नागपूर,
Narmada Parikrama नर्मदा परिक्रमा कार्तिकी एकादशीनंतर सुरू होते. याच शुभ दिवशी अनेक भाविक परिक्रमा आरंभ करतात. नागपूरातूनही काही भाविक नर्मदा परिक्रमेसाठी निघणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सिताबर्डीतील नागनदी संगमावर नदीपूजन व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

kmnt 
 
या प्रसंगी प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. श्रीरंग दिवाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नर्मदाष्टक उपासना मंडळाचे मुख्य समन्वयक किशोर पौनीकर (नर्मदापुरकर) आणि बीज संकलन उपक्रमाचे प्रमुख अनंत वकील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. Narmada Parikrama आपल्या भाषणात डॉ. दिवाण म्हणाले,“नर्मदा परिक्रमा ही व्यावहारिक यशस्वितेसाठी नव्हे, तर आत्मोद्धारासाठी करायला हवी.”कार्यक्रमात नागपूरातील अनेक गणमान्य नागरिक आणि नर्मदाभक्तांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: किशोर पौनीकर,सम्पर्क मित्र
Powered By Sangraha 9.0