भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा

06 Nov 2025 18:51:56
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sindhi-society : सिंधी समाजाचे आराध्य दैवत वरूणावतार भगवान झूलेलाल यांच्याविषयी अमित बघेलने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत यवतमाळ जिल्ह्यातील सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाèयांना लेखी निवेदन देण्यात आले. बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
 
 
 
y6Nov-Sindhi
 
 
 
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे 26 ऑक्टोबर रोजी आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह आणि सांप्रदायिक वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. त्यामुळे देशभरातील सिंधी समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक आस्थेचा अपमान करणारे असे वक्तव्य अमान्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
 
 
सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाèयांना दिलेल्या निवेदनात, अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
यावेळी कवर नगरपंचायत अध्यक्ष मनोहर तिलवानी, पूज्य डेरकी पंचायत अध्यक्ष भजनलाल बख्तियार, पळसवाडी कॅम्प पंचायत अध्यक्ष जगदीश वाधवानी, प्रकाश गोविंदानी, अ‍ॅड. आकाश मंगतानी, प्राचार्य टिकमदास छतानी, सुरेंद्र होतवानी, नारू कमनानी, अनिल गाबडा, बन्सीलाल छत्तानी, कन्हैयालाल मंगारामानी, दिलीप प्रेमचंदानी, राधाकृष्ण जाधवानी, प्रकाश बत्रा, पंकज नानवाणी, प्रकाश उदासी, सुशील अंबरतानी तसेच यवतमाळ नगरातील संपूर्ण सिंधी समाजाचे 250 ते 300 समाजबांधव सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0