राकाँ शप गटाची आढावा बैठक

06 Nov 2025 20:11:33
हिंगणघाट,
ncp-sharad-pawar-group : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आम्ही निवडणुकांसाठी तयार असल्याचे वांदिले यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते सुनील राऊत, माजी नगराध्यक्ष बबन हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेव गौळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, सुधाकर खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सचिव श्रीकांत भगत, प्रशांत घवघवे  उपस्थित होते.
 
 
ncp-sharad-pawar-group
 
राष्ट्रवादी काँग्रेस शररचंद्र पवार पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावे असे आवाहन अतुल वांदिले यांनी आढावा बैठकीत इच्छुक उमेदवारांना केले. बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, बूथस्तरावरची संघटन रचना, मतदार नोंदणी, जनसंपर्क अभियान, आणि स्थानिक प्रश्नांवर पक्षाने घेतलेली भूमिका यावर चर्चा करण्यात आली.
 
 
जिल्हाध्यक्ष वांदिले यांनी राकाँ शरदचंद्र पवार पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज आहे. येणार्‍या निवडणुकीत आपण गावपातळीपासून जनतेचा विश्वास जिंकून मजबूत पर्याय म्हणून उभे राहू.  शहर व ग्रामीण भागात युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असून कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याकरिता प्रमुख पदाधिकार्‍यांना जबाबदारी देण्यात आली.  संचालन अमोल बोरकर यांनी केले तर आभार प्रशांत घवघवे यांनी मानले. यावेळी मिलिंद कोपुलवार, बालू वानखेडे, गंगाधर कलोडे, सुनील डोंगरे, आशिष देवतळे, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, मिलिंद हिवलेकर, गणेश वैरागडे, गजानन शेंडे, संजय लोणकर, मंगेश गिरडे, सुभाष चौधरी, अनिल देशमुख, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, अनिल आडकीने, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0