श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे २५ वर्षांचे अखंड उपक्रम

06 Nov 2025 13:52:15
खामगाव,
Shri Sadguru Eknath Maharaj Bhajani Mandal स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री गुरू नानक देव जयंती आणि त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा निमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्तिक शुक्ला १४, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता भगवान श्री कृष्ण आणि तुळशी रूपातील रूक्मिणी माता यांचा शुभ विवाह पारंपरिक पद्धतीने मंगलमय वातावरणात संपन्न झाला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्षांपासून धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंडपणे चालवले जात आहेत.
 
 
Shri Sadguru Eknath Maharaj Bhajani Mandal
 
त्रिपुरारी पोर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचा वध केला होता, म्हणून या पोर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पोर्णिमा असे म्हणतात. या दिवशी घरात, देवळात, शिवालयात, गंगेच्या तिरावर दिवे लावणे, दिपदान करणे, गंगा स्नान करणे आणि कार्तिक स्वामीचे दर्शन घेणे हा विधी पाळला जातो. ५ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी सर्वप्रथम श्री सदगुरू एकनाथ महाराजांनी श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि श्री गुरू नानक देव यांच्या प्रतिमेला माल्यां अर्पण करून जयंती उत्साहात साजरी केली. संध्याकाळी ६ वाजता ओंकारेश्वर मंदिर, मठ येथे देविदास शर्मा यांच्या हस्ते महाआरती पार पडली, आणि ५००० दिवे लावून भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
 
 
कार्यक्रमात जेष्ठ लक्ष्मणराव गाडे, संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, सचिन केवारे, रमण अग्रवाल, प्रमोद सुरंगे, लालाजी सांगळे, किशोर अतकरे, सागर चुंबळकर, रामदास ढोले, पापा मुक्ते, राजु इंगळे, मोहन भोसले, गजानन निमकर्डे, विक्रांत माने, प्रविण डवले, शिवम ढोले, श्री गायकवाड, सुभाष भिल्लारे, अशोक आनंदे, विनोद चिमणकर, अशोक पऊळ, अशोक मोरे, मोहन भवर, जसबीरसिंग चव्हाण, जयंत घोगरे, अशोक काळे, भगत गुरूजी, निलेश इंगळे, प्रसाद पांडव, प्रकाश जोगदंड, राजु ढेरे, तसेच महिलांमध्ये आशाबाई अंधारे, जया सुकाळे, मुन्नी चव्हाण, प्रमिलाबाई शिंदे, निर्मला भोसले, जान्हवी शर्मा, किर्ती शर्मा, जयश्री चिमणकर, शारदा नेमाडे, सुजाता शिंदे, सुनिता तायडे, सुमन गिरे, दुर्गा पवार, पुष्पा शिंदे, गायत्री शिंदे, कामिनी शिंदे, स्वरा अवचार, सई गरड, आराध्या ढोले, अनुष्का घट्टे, स्वप्नाली अवचार, पार्वती महाडिक, लक्ष्मी खरपाडे, उषा शर्मा, अनिता बोंन्द्रे, सुशिला आवलकर, बेबी आवलकर यांची उपस्थिती होती. शिवाजी नगर आणि सतिफैल भागातील शेकडो महिला-पुरुषांनी हजर राहून उत्सवाची शोभा वाढवली. मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की धार्मिक व सामाजिक उपक्रम हे निस्वार्थपणे चालू ठेवण्याचा ध्यास मंडळाला आहे.
Powered By Sangraha 9.0