तभा वृत्तसेवा
राळेगाव,
sneha-popat-kapil-popat : शहरातील स्नेहा पोपट व कपिल पोपट या बहिण भावांनी आपआपल्या क्षेत्रात यशोशिखर गाठून राळेगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. येथील प्रतिष्ठीत नागरिक संजय पोपट व रीना संजय पोपट यांची ही मुले आहेत.
कपिल याने सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर स्नेहा हिची भारत सरकारच्या अंतर्गत येणाèया नामांकित टाटा रिसर्च सेंटर येथे प्रकल्प सहायक म्हणून निवड झाली.
दोन्ही अपत्यांच्या उतुंग यशामुळे राळेगाव तालुक्यातील अनेकांनी कपिल व स्नेहासह पोपट परिवाराचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.