‘भस्मासुर’ची कथा आणि पाकिस्तानचा तालिबानसोबतचा खेळ

06 Nov 2025 11:27:21
इस्लामाबाद, 
pakistan-taliban ‘भस्मासुर’ नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान शंकरांची कठोर तपस्या करून त्यांच्याकडून असा वरदान घेतला की, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल. पण वरदान मिळताच भस्मासुराने स्वार्थीपणे देवांवरच हात उचलण्याचा प्रयत्न केला. शेवटी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्याला स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला भाग पाडले, आणि तो स्वतःच भस्म झाला.
 
pakistan-taliban
 
ही पुराणकथा सध्या पाकिस्तानच्या स्थितीवर तंतोतंत लागू होते. कारण, पाकिस्तानच्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी मान्य केले आहे की काबूलमध्ये ‘एक प्याला चहा’ पिण्याची किंमत पाकिस्तानला फार महागात पडली. इशाक डार बुधवारी सिनेटमध्ये बोलताना म्हणाले, “अफगाणिस्तानासाठी सीमारेषा उघडण्याचा निर्णय पाकिस्तानची सर्वात मोठी चूक ठरली. त्या काळात आम्ही तालिबानला सहानुभूती दाखवली आणि आज त्याचाच फटका बसतोय. अशी चूक पुन्हा करायची नाही.” डार यांचा हा उल्लेख 2021 मधील घटनेशी संबंधित आहे. pakistan-taliban त्या वेळी तत्कालीन आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर लगेच काबूलमध्ये तालिबान नेत्यांसोबत बसून ‘चहा पिला’ होता. त्या भेटीत पाकिस्तानने जगाला दाखवायचा प्रयत्न केला होता की तो अफगाणिस्तानच्या पाठिशी आहे. मात्र, आता त्याच निर्णयाचे परिणाम पाकिस्तान स्वतः भोगतोय.
माहितीनुसार, इशाक डार यांनी मान्य केले की पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे अफगाणिस्तानातून कार्यरत दहशतवादी संघटनांचा हात आहे. त्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), फितना अल-ख्वारिज आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. pakistan-taliban म्हणजेच, ज्या तालिबानला पाकिस्तानने ‘धोरणात्मक खोली’ म्हणून वाढवले, तोच आता त्याच्या नाशाचे कारण ठरत आहे — अगदी भस्मासुराच्या स्वतःच्या हाताने स्वतःच भस्म होण्यासारखे.
Powered By Sangraha 9.0