श्री विठ्ठल मंदिरात तुळशी विवाह सोहळा

06 Nov 2025 19:36:00
नागपूर,
Shri Vitthal Mandir तपोवन वसाहत, जयप्रकाश नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सामूहिक तुळशी विवाह सोहळा पार पडला. या मंदिरात गेल्या ३० वर्षांपासून तुळशी विवाह सोहळा नियमितपणे आयोजित केला जात आहे.
 
Shri Vitthal Mandir
 
यंदा दैनिक तरुण भारतातर्फे मिळालेल्या विशेष तुळशी वृंदावनाला अग्रस्थानी ठेवण्यात आले, तर परिसरातील रहिवाश्यांनी आपापल्या घरातून तुळशी वृंदावन आणले. पूजा व सोहळ्याची सर्व व्यवस्था मंदिराच्या वतीने करण्यात आली. यंदा एकूण ११ जोडपी विवाहासाठी पूजेवर बसली. Shri Vitthal Mandir विवाह समारंभाला प्रकाश भोयर, माजी सभापती, मनपा, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम महाप्रसादाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य विनोद त्रिवेदी, सुषमा सागदेव, विनायक अडकर, मनिष केसरवाणी, मुकेश जोगी, मिलिंद देशमुख, आनंद किटकरू, दशरथ वांढरे, तसेच तपोवन महिला भजन मंडळ आणि इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: विजय दाणी, सपंर्क मित्र
Powered By Sangraha 9.0