तभा वृत्तसेवा
वणी,
bharat-mata-stuti-gaurav-din : बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमाता स्तुती प्रेरणा स्तोत्राला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथील शासकीय मैदानावर भारतमातेच्या स्तुतीचा गौरवदिन 7 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सार्धशताब्दी महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे व मुख्य वक्ता म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा प्र. प्रशासन अधिकारी गजानन कासावार मार्गदर्शन करणार आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येत असलेल्या या कार्यक्रमात वणी शहर व तालुक्यातील 2 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन करण्यात येणार आहे. या प्रसंगी वणीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुमडे व वंदे मातरम तालुकास्तर आयोजन समितीने केले आहे.