नवी दिल्ली,
pm-modi-and-indian-womens-team भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकून इतिहास रचला असून, या विजयानंतर ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी संपूर्ण संघाचे मन:पूर्वक स्वागत केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या विश्वविजेत्या संघाचे पंतप्रधानांनी अभिनंदन करत म्हटले की, सलग तीन सामने गमावूनही संघाने ज्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुनरागमन केले, ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

पंतप्रधान मोदी आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या भेटीचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या भेटीत मोदींनी खेळाडूंशी हलक्या फुलक्या गप्पांमध्ये त्यांच्या भावनिक आणि वैयक्तिक क्षणांबद्दल चर्चा केली. कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी २०१७ च्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “त्या वेळी आम्ही पंतप्रधानांना ट्रॉफीशिवाय भेटलो होतो, पण आज ट्रॉफी घेऊन आलो आहोत. अशा भेटी पुन्हा पुन्हा व्हाव्यात अस आम्हाला वाटते.” उपकर्णधार स्मृती मंधानानेही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “पंतप्रधान नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात. देशातील मुली आज प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि यात पंतप्रधानांचा मोठा वाटा आहे.” दीप्ती शर्माने आनंद व्यक्त करत म्हटले की, “२०१७ मध्ये मोदीजींनी सांगितले होते की मेहनत करत रहा, एक दिवस स्वप्न पूर्ण होईल. pm-modi-and-indian-womens-team आज ते स्वप्न साकार झाले आहे.” तिच्या “जय श्रीराम” इंस्टाग्राम पोस्ट आणि भगवान हनुमानाच्या टॅटूबद्दल मोदींनी विचारले असता दीप्ती हसत म्हणाली, “तो मला शक्ती देतो.”

पंतप्रधान मोदींनी हरमनप्रीत कौरला विचारले की, “तू विजय मिळाल्यानंतर बॉल खिशात का ठेवली?” त्यावर हरमन म्हणाल्या, “हा बॉल माझ्यासाठी खास आहे, अजूनही माझ्या बॅगेत आहे.” शेफाली वर्माशीही मोदींनी संवाद साधला. तिने विचारले, “तू कॅच घेण्याआधी हसत होतीस, का बरं?” त्यावर शेफाली म्हणाली, “मी मनात म्हटलं होतं ‘ कॅच माझ्याकडे ये,’ आणि जसा कॅच आला, तस हसू आले!” या संपूर्ण भेटीत पंतप्रधान मोदींच्या सहज वर्तनाने आणि खेळाडूंच्या आत्मीय संवादाने एक प्रेरणादायी आणि भावनिक क्षण निर्माण झाला. pm-modi-and-indian-womens-team भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा गौरव संपूर्ण देश साजरा करत आहे.