वर्धेचे माजी नगराध्यक्ष ठाकूरांच्या हातावर घड्याळ

07 Nov 2025 20:34:36
वर्धा, 
Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्ष बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. वर्धा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर, जिप बोरगाव मेघे सर्कलचे माजी सदस्य पंकज सायंकार यांनी आज ७ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आ. संजय खोडके, हिंगणघाट कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी उपस्थित होते.
 
 
pawar
 
संतोष ठाकूर नगर पालिका निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून आले आहेत. ते वर्धा नपचे नगराध्यक्ष होते. बोरगाव मेघे येथील जिपचे माजी सदस्य पंकज सायंकार यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीचा कानोसा घेत पक्षबदल केला. अलीकडेच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षात घेतलेले माजी नगरसेवक तथा गटनेते गजू खोंड हे या पक्षप्रवेशासाठी या तीन नेत्यांच्या सोबत आहे. संतोष ठाकूर यांची काम करण्याची पद्धत शहरातील अनेकांना ठाऊक आहे. आगामी नप निवडणुकीत ते नगराध्यक्षपदाचे दावेदार राहू शकतात.
Powered By Sangraha 9.0