फटाके आणि हायड्रोजन बॉम्ब

07 Nov 2025 17:33:08
अग्रलेख...
Bihar Assembly Elections बिहारमधील विधानसभा निवडणुकांचे रंगात आलेले राजकारण केवळ मतांची टक्केवारी, जाती-धर्माची परंपरागत गणिते एवढ्या मर्यादित मुद्यांभोवती फिरणारे राहिलेले नाही. आता होत असलेली ही निवडणूक म्हणजे, भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील राजनीतीला मिळणारा कौल असेल. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवडणूक राजनीतीचा बाजच वेगळा बिहारमधील निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी उचलून धरलेल्या मतचोरीच्या मुद्याचा नवा अंक ‘एच फाईल्स’ या नावाने बुधवारी सादर करण्यात आला. हरयाणामध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २५ लाख मतांची चोरी झाल्याचा व मतदार यादीत अनेक नावांची दुबार किंवा त्याहून अधिक वेळा नोंद झाल्याचा आरोप करून त्यास पुष्टी देणारे काही पुरावेही त्यांनी माध्यमांसमोर हे सारे एक नियोजनबद्ध कारस्थान असल्याचा आरोप करून त्यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा नवा प्रयत्न केला. त्यांचा हा नवा कथित हायड्रोजन बॉम्ब सत्ताधारी भाजपाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला जोरदार धक्का देणार, अशी जोरदार हवा त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेस व भाजपाविरोधी आघाडीने तयारही केली होती; पण या पक्षांचाच झाला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या या आरोपांचे खंडन केले आहे.
 
 
bihar
 
मतदार यादीत दोष असेल तर काँग्रेसच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी त्यास वेळीच आक्षेप का घेतला नाही, निवडणुकीआधी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत एकदाही तक्रार किंवा आक्षेप नोंदविला नाही, अनेक वेळा मतदान करणार्‍यांना रोखले नाही आणि मतदान केंद्रांतील त्रुटी दाखविल्या नाहीत, हा आयोगाचा खुलासा लोकशाही प्रक्रियेशी सुसंगत असाच आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर कितीही आवेशांत कागदपत्रांचे गठ्ठे उघडले, मतदारांना समोर उभे करून मतचोरीच्या कहाण्या रचल्या, तरी ज्या लोकशाही यंत्रणेच्या कारभारास आव्हान देण्यासाठी न्यायालये हाच योग्य मार्ग ठरतो; तिकडे जाण्याची मात्र त्यांची तयारी नाही. आपण माध्यमांच्या साक्षीने देशासमोर जे काही उघड करीत ते न्यायालयांस दिसत असल्याने न्यायालयाने याची दखल घ्यावी ही त्यांची अपेक्षा म्हणजे, लोकशाही यंत्रणांना आपल्या अपेक्षेनुसार वागविण्याचा व वाकविण्याचा प्रयत्न ठरू शकतो. राहुल गांधी यांना त्यांच्या आरोपांचे ठोस पुरावे घेऊन न्यायालयासमोर जावे लागेल. कारण लोकशाहीमध्ये तोच एक न्याय मिळविण्याचा न्याय्य मार्ग असतो. पण तसे होणार नसल्याने राहुल गांधींच्या कथित बॉम्बचा स्फोट तर होणे शक्य नाहीच; पण त्यांना अपेक्षित असलेला परिणामही साधता येणार नाही. हरयाणाच्या निवडणुकीतील गैरप्रकारांचे आरोप बिहार निवडणुकांच्या तोंडावर करण्यासाठी माध्यमांचा मंच वापरून Bihar Assembly Elections बिहारी मतदारांच्या मनात निवडणूक यंत्रणा, सरकार, न्यायालये आदी लोकशाही व्यवस्थांविषयी संशयाचे ढग उभे करण्याचा आणि जनतेस संभ्रमित करून त्याचा तात्कालिक राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा दिसतो. ही नीती बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या निवडणूक नीतीपेक्षा वरचढ ठरेल आणि या निवडणुकीत प्रभावी ठरू पाहणार्‍या तेजस्वी यादव यांच्या प्रतिमेहून राहुल गांधी यांची प्रतिमा उजळण्याच्या प्रयत्नापलीकडे या कथित हायड्रोजन बॉम्बचा परिणाम होईल, अशी शक्यता धूसरच आहे. लोकशाहीतील कोणत्याही यंत्रणांची कार्यपद्धती संशयातीत असली पाहिजे आणि त्यांच्या कामगिरीवर कोणतेही बोट जाऊ नये ही रामराज्याची संकल्पना आहे. राहुल गांधी यांनी न्यायालयात न जाता या यंत्रणांवर जाहीर आरोपांचे सत्र अवलंबिले असल्याने, त्यातून तावूनसुलाखून निघण्याकरिता आयोगास अग्निपरीक्षा देणे भाग पडावे, हाच या राजकारणाचा बाज दिसतो.
 
 
Bihar Assembly Elections बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआसमोर लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी मोठे आव्हान उभे केल्याची जोरदार निर्माण करण्यात आली आहे. निवडणुकीच्या राजकारणात अशी रणनीती आखली जातेच. तेजस्वी यादव यांनीही प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘बिहार का तेजस्वी प्रण’ असे त्यांच्या आश्वासनाचे वर्णन केले जात आहे. मागच्या निवडणुकीतही त्यांनी दहा लाख रोजगारांची हमी दिली होती; पण हे रोजगार कोठून आणणार, याचा ठोस आराखडा त्यांनी मांडला नाही. त्यामुळेच बेरोजगारीमुळे हतबल झालेल्या आणि बौद्धिक विकासाची आस असलेल्या युवक मतदारांना तेजस्वी यादव यांची ही घोषणा भुलवू शकली नाही.
 
 
निवडणुकीआधी केल्या जाणार्‍या अशा घोषणांतून पुढे येणार्‍या काही प्रश्नांची उत्तरे तेजस्वी यादव यांच्याकडे नाहीत. या घोषणांचा राज्याच्या तिजोरीवर होणारा परिणाम कसा रोखणार याचा काहीच आराखडा नाही. त्यामुळे घोषणांच्या अंमलबजावणीबाबत जनतेच्या मनात विश्वास रुजविणे तेजस्वी यादव यांना सोपे नाही. एका बाजूला तेजस्वी यादव यांची आश्वासनांची खैरात, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाविरुद्धचा संघर्ष आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षांच्या केंद्रातील सत्ताकाळात आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारकीर्दीत बिहारच्या जनतेमध्ये झालेल्या मानसिक परिवर्तनाची कसोटी या निवडणुकीत पुन्हा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर बुधवारी नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आयोजित केलेल्या धन्यवाद बिहार मेळाव्यात पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाचे नेमके विश्लेषण केले होते. तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत विकासाची फळे पोहोचून त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून हा खरा विकास आहे, ही पक्षाची भावना मोदी यांनी त्या मेळाव्यात अधोरेखित केली होती. बिहारने ही भावना ओळखली, याचाही त्यांनी उल्लेख केला. Bihar Assembly Elections बिहारचे राजकारण सामाजिक रचनेभोवती फिरत ठेवण्याचा भाजपेतर पक्षांच्या राजकारणाचा डाव या निवडणुकीत फसला होता. बिहार हे कर्तबगारांचे राज्य आहे. या राज्याने देशाला अनेक सनदी अधिकारी दिले. पोलिस उल्लेखनीय काम करणारे अनेक अधिकारी बिहारमधूनच देशाच्या कानाकोपर्‍यात गेले. साहजिकच या राज्यातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात उत्कर्षाची स्वप्ने कधीपासूनच रुजलेली आहेत; पण ती स्वप्ने साकारण्याच्या साधनांचा स्थानिक पातळीवर अभाव हे बौद्धिक विकासासमोरील मोठे आव्हान आहे. प्रशांत किशोर सारख्या नेत्याने आपल्या पक्षाचा प्रचारही या जाणिवेभोवती केंद्रीय ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपाने मुळाशी जाण्याचा निर्धार केला होता आणि बिहारमधील तरुणाला त्याच्या क्षमतांचा विकास घडविता येईल अशा शैक्षणिक सुविधा राज्यातच उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील दिली होती.
 
 
Bihar Assembly Elections निवडणुकीआधीचे आडाखे आणि मतदारांची मानसिकता, मतदानाआधीची गणिते यांमध्ये खूप अंतर असते. बिहारच्या राजकारणाची गणिते राज्यातील सुमारे १४ टक्के यादव, सुमारे १८ टक्के मुस्लिम, ३० टक्के मागासवर्गीय, जाती-जमाती, अन्य समाजाच्या मतपेट्यांवर केंद्रित होत असत. भाजपा आघाडीने या राजकारणास पूर्णविराम देऊन केवळ विकासाच्याच भाषेवर भर दिला. सर्व वयोगटांतील आणि समाजघटकांतील महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला केंद्रित विकास योजनांवर दिलेला भर आणि त्याच्या जोडीला नितीश कुमार यांच्या सरकारने आपल्या सत्ताकाळात विद्यार्थिनींसाठी राबविलेल्या शैक्षणिक योजना या मुद्यांनी जातिपातीच्या या राजकारणावर मात केली आहे. महिला हा भाजपाचा ‘सायलेंट व्होटर’ आहे, हे बिहारमधील महिलांनी भाजपाला दिलेल्या भरघोस पाठिंब्यावरून याआधीही सिद्ध झाले आहे. आता या निवडणुकीआधी बिहारमध्ये महिलांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमुळे यात भरच पडेल, असे चित्र विरोधकांनीही ओळखले आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीतून उमटणारे राष्ट्रीय राजकारणाचे रंग राहुल गांधींचे भविष्य ठरविणार आहेत, मात्र शंका नाही.
Powered By Sangraha 9.0