अकोला,
female-clerk-in-sp-office-arrested जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील (५०) रा.गीता नगर यांना आठ हजारांची लाच स्वीकारतांना अमरावती लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली.चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयात एसीबीची कारवाई झाल्याने येथील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तक्रारदार हे धान्याचे व्यापारी असून त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांची फसवणूक केली होती. त्यानंतर रामदास पेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास देखील सुरू होता. दरम्यान आरोपीला जमानत मिळाली.या संदर्भातील नोटशीट पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यासाठी येथील आस्थापना विभागाच्या वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील यांनी तक्रारदार यांना दोन टप्प्यात २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.यातील आठ हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. female-clerk-in-sp-office-arrested ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावतीचे पोलीस अधीक्षक, मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक, सचिंन्द्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे, यांचे मार्गदर्शनात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक, ज्ञानोबा फड, पोलीस हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे, पोकॉ. शैलेश कडू, चालक पोउपनि. सतिश किटुकले यांनी यशस्वीरित्या पार पाडली.