जयताळा येथील हनुमान मंदिरात तीन दिवस धार्मिक उत्सव

07 Nov 2025 12:03:51
नागपूर,
Hanuman Temple Jayatala जयताळा रोडवरील प्रसाद नगर येथील हनुमान मंदिरात कार्तिक महिन्यानिमित्त तीन दिवस चाललेला धार्मिक उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी काकड आरतीचे आयोजन करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी आरतीचे मंगल स्वर आणि घंटानादाने संपूर्ण परिसर पवित्र झाला होता. भक्तगण मोठ्या श्रद्धेने आरतीत सहभागी होत होते.

shrmila 
 
 
या धार्मिक उपक्रमाचा समारोप कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाह आणि दीपोत्सवाने करण्यात आला. तुळशी विवाहासाठी तरुण भारत तर्फे विशेष तुळशी विवाह किट देण्यात आली होती. Hanuman Temple Jayatalaत्या साहाय्याने मंदिरात पारंपरिक रीतीरिवाजांनुसार मंगलाष्टकांच्या गजरात तुळशी आणि भगवान विष्णूचा विवाह सोहळा पार पडला.या प्रसंगी संध्याकाळी मंदिर परिसरात दिव्यांच्या प्रकाशाने दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रसाद नगर येथील रहिवासी महिला, पुरुष, बालके आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर दिवे लावून परिसराला उजळवून टाकले.हनुमान मंदिराचे कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक भक्त यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.
सौजन्य:शर्मिला चौरासिया,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0