प्राणघातक इंजेक्शने १० रुग्णांना मारले तर २७ जणांना मारण्याचा प्रयत्न

07 Nov 2025 10:46:30
बर्लिन.
Killed by lethal injection जर्मनीमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण जगाला हादरवून गेली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आणि उपचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका नर्सनेच आपल्या १० रुग्णांना मृत्यूच्या दारी ढकलले. एवढेच नव्हे, तर तिने आणखी २७ रुग्णांना मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप सिद्ध झाला आहे. पश्चिम जर्मनीतील वुर्सेलन शहरातील न्यायालयाने या निर्दयी नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
Poisonous injection
 
ही भीषण मालिका डिसेंबर २०२३ ते मे २०२४ दरम्यान वुर्सेलन येथील रुग्णालयात घडली. तपासात उघड झाले की, नर्स रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना ती मानसिक ताण आणि चिडचिडीने ग्रासली होती. या चिडचिडीचा राग ती निरपराध रुग्णांवर काढत होती. नर्सने बहुतेक वृद्ध रुग्णांना प्राणघातक इंजेक्शन देऊन त्यांचा जीव घेतला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले की, आरोपी नर्सने आपल्या रुग्णांबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. ती सतत चिडचिडलेली असायची आणि तिच्या भावनांवर नियंत्रण नसल्याने तिने ही अमानुष कृत्ये केली. पोलिसांनी सांगितले की, तिने ३७ हून अधिक रुग्णांचे प्राण धोक्यात घातले होते आणि तिच्या काळात उपचार घेतलेल्या इतर रुग्णांचीही सखोल चौकशी सुरू आहे.
या नर्सने २००७ मध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०२० मध्ये वुर्सेलन येथील रुग्णालयात नोकरीला सुरुवात केली होती. अखेर, २०२४ मध्ये तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला शिक्षा सुनावताना म्हटले की, तिचा गुन्हा अत्यंत गंभीर आणि अमानुष आहे. या प्रकरणाची तुलना २०१९ मध्ये दोषी ठरवलेल्या जर्मन नर्स नील्स होगेल यांच्याशी करण्यात येत आहे. होगेलने १९९९ ते २००५ दरम्यान ८५ रुग्णांची हत्या केली होती आणि त्यालाही जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
Powered By Sangraha 9.0