लग्नाच्या पाच महिन्यानंतरच विवाहितेची आत्महत्या

07 Nov 2025 15:58:20
नागपूर,
months-after-marriage पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका विवाहितेनेे बुधवारी आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरच्या व्यक्तींकडून हाेणा-या छळाला कंटाळूनच मुलीने गळास घेऊन आत्महत्या केल्याचा आराेप करीत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने गुरुवारी दुपारी नंदनवन पाेलिसाकडे केली.नंदनवन पाेलीस हद्दीतल्या हसनबाग काॅम्प्लेक्समधील 23 वर्षीय या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी नुमान शेख गफफ्ार याच्याशी विवाह झाला हाेता. विशेष म्हणजे या दाेघांचाही हा दुसरा निकाह हाेता. लग्नानंतर लगेचच तिच्या सासरच्या लाेकांनी मुलीला हुंड्यासाठी त्रास देऊन मारहाण सुरू केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मुलीने साररकडून हाेणारा हा छळ अनेकदा रडत रडत कथनही केला हाेता. मात्र कुटुंबियांनी दाेघांचीही समजूत काढत समेट घडवून आणला.

months-after-marriamonths-after-marriagege
तरीही सारसरकडून छळ हाेत असल्याचे मंगळवारी मुलीने पुन्हा कुटुंबियांना ाेनवरून याची माहिती दिली. त्यामुळे मंगळवारी 4 ऑक्टाेबला रात्री मुलीच्या सासरी पाेचलेल्या कुटुंबियांनी पुन्हा सासरच्या लाेकांची समजूत काढली. दुसèया दिवशी सकाळी कुटुंबिय मुलीला सासरवरून माहेरी नेणार हाेते. दरम्यान विवाहितेने आपल्या खाेलीत गळास घेऊन आत्महत्या केली. नुमान शेख याने याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबियांनी गुरुवारी नंदनवन पाेलिस ठाणे गाठले. सासरच्या लाेकांनी हुंड्यासाठी छळ केल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याच्या आशयाची तक्रार कुटुंबियांनी केल्याने नंदनवन पाेलिसांनी पती नुमान शेख, सासू अकिला, नणंद सना, नणंदेचा पती माेईन आणि नणंदेची सासू शहनाज या पाच जणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल दाखल करत यातला पती नुमान आणि माेईन या दाेघांना पाेलीसांनी अटक केली.
Powered By Sangraha 9.0