विशेष
मोरेश्वर बडगे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात Municipal Council and Nagar Panchayat elections नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका होणार आहेत. मतदार याद्या सदोष असल्याचे कारण पुढे करून निवडणुका ढकलू मागणार्या विरोधी पक्षांना हा तडाखा आहे. त्यांना आता लढावेच लागेल; पण लढणार कसे? संविधानाचे ‘लाल पुस्तक’ दाखवून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेला भुलवले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला खड्डा पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागली. विधानसभा निवडणुकीत कुठलाही नॅरेटिव्ह नव्हता. त्यामुळे विरोधकांनी मार आता त्यांनी ‘मत चोरी’ नावाचा नवा मुद्दा शोधला आहे. मतदार याद्या सदोष आहेत, असे सांगून त्यांनी निवडणुकाच पुढे ढकला, याद्या दुरुस्त करून मग निवडणुका घ्या, असा धोशा चालवला आहे. लोकसभेत जिंकले तेव्हा विरोधकांना मतदार यादीतले दोष दिसले नाहीत. मुळात ते निवडणुकीला घाबरले आहेत. जनता आपल्याला जवळ करणार नाही, ही त्यांना सतावते आहे. त्यातून हे नखरे सुरू झाले आहेत. पण निवडणुका होणार. विरोधकांना त्या लढाव्याच लागणार. नाही म्हणून सांगणार कोणाला? राजकीय पक्ष निवडणुकांसाठीच असतो. निवडणुकाच लढायच्या नाहीत म्हटले तर पक्षच संपतो. तुम्ही पाहाल. राज ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सारे लढतील. लढले नाही तर त्यांचेच लोक त्यांना सोडून बंडखोर म्हणून लढतील. प्रत्येकाला आपापले राजकारण आहे.

शरद पवार कित्येक वर्षे सत्तेत होते. काही केले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवावा, असे वाटले नाही. मतदार याद्या सुधाराव्या, असे वाटले नाही. मात्र सत्ता गेली की मागायला हे मोकळे. मत चोरी विरोधी पक्षही रोखू शकतो. त्यासाठी Municipal Council and Nagar Panchayat elections निवडणूक आयोगाची गरज नाही. कोर्टात जायची गरज नाही. चाणाक्ष पोलिंग एजंट ठेवले तर मत चोरी तिथल्या तिथे पकडता येते; पण हे करायची विरोधकांची तयारी नाही. त्यांना राजकारण करायचे आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू चार वेळा आमदार होते. त्या काळात त्यांना शेतकरी आठवला नाही. आता रिकामपण आल्यावर शेतकर्यांचे आंदोलन चालवत आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचीही अशीच अवस्था मुंबईमध्ये उद्धव यांचे देऊळ पाण्यात आहे. २५ वर्षे एकहाती राहिलेली मुंबई महापालिका हातची जाणार या जाणिवेने उद्धव अस्वस्थ आहेत. त्या मानसिकतेतूनच त्यांनी २० वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या भावाला सोबत घेतले. तरीही माहोल सुधारत नाही हे पाहून त्यांनी लोकांमध्ये संभ्रमावस्था पसरवणे सुरू केले आहे.
Municipal Council and Nagar Panchayat elections निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेविषयी लोकांमध्ये संशय निर्माण जात आहे. निवडणूक आयोग सत्ताधार्यांच्या हातचे बाहुले बनला, असे ते म्हणतात. त्या जोशात मतदार याद्यांची चिरफाड करताना ठाकरे बंधू थकत नाहीत. दुबार मतदारांचा विषय मांडताना विरोधकांनी केवळ मराठी माणसांचीच नावं सांगितली. हिंदू-मराठी माणसंच दोन-तीन वेळा नोंदणी करून भाजपाला जिंकवतात, असे त्यांना सुचवायचे आहे का? मतदार याद्यांमध्ये गफलत नाही, असे कधीही म्हटलेले नाही. पण विरोधकांनी लपवली ती मुस्लिम दुबार मतदारांची नावं भाजपा नेते आशिष शेलार यांनी उजेडात आणली. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार १२४३ मतांनी जिंकले. त्यांच्या मतदारसंघात दुबार मुसलमान मतदारांची संख्या ५५३२ आहे. नाना पटोले फक्त २०८ मतांनी जिंकले. तेथे मुसलमानांची दुबार मतं ४७७ आहेत. ही यादी ठाकरेंना का नाही? भोईर, पाटीलच का दिसले? मतदार याद्या सदोष आहे असे म्हणता, पण याच याद्यांच्या जोरावर महाराष्ट्र विकास आघाडीने लोकसभेच्या ३१ जागा जिंकल्या आहेत. तेव्हा तर कोणी ओरडा केला नाही. लोकसभेच्या वेळी होत्या त्याच मतदार याद्यांवर विधानसभा निवडणूक झाली. आपण जिंकलो तर सारे बरोबर. हरलो तर मतचोर हा विरोधकांचा शुद्ध आहे. विरोधकांनी आखलेले हे ‘फेक नॅरेटिव्ह’ आहे. शेलारमामांनी ठाकरेंना बरोब्बर उघडे पाडले. मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजेत, असे सार्यांनाच वाटते. त्या आधार कार्डशी, बँक खात्याशी जोडल्या तरच ते होऊ शकते. पण तशी कोणाची इच्छा आहे? त्या ऐवजी मोर्चा काढणेच विरोधकांना आवडते.
Municipal Council and Nagar Panchayat elections मतदार याद्यांमधील घोळाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत काढला. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव दिले गेले. सत्य शोधावं लागणार्या या मोर्चात मुलूखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे उबाठाचे खासदार संजय राऊत नव्हते. ‘गंभीर आजार झाल्याने दोन महिने आपण सार्वजनिक जीवनात दिसणार नाही’ असे संजय राऊत यांनी मागेच जाहीर केले होते. मात्र पूर्ण मोर्चात त्यांचे नाव घेण्याची इच्छाही झाली नाही हे नवलच. सकाळी नित्यनियमाने सत्ताधार्यांविरोधात राऊत सडकून टीका करत. गेली सहा वर्षे ते ही गोष्ट नित्यनियमाने करत आले आहेत. सत्ताधारी ‘सकाळचा भोंगा’ म्हणून त्यांची टिंगल उडवतात तो भाग वेगळा. पण हा भोंगा सध्या बंद आहे. नियती कोणाला चुकली? असे म्हटले जाते तेच खरे. मात्र त्यांची दखल सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी घ्यावी हेही नवलच. ‘तुमच्या तब्येतीत सुधारणा होवो यासाठी मी प्रार्थना करतो’ असे ट्विट मोदींनी केले. दैनिकाचा जाहिरात व्यवस्थापक, वार्ताहर, पुढे कार्यकारी संपादक, नंतर शिवसेनेचे राज्यसभा सदस्य या विविध रूपात राऊतांची ओळख द्यावी लागेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे ते होते.
आताही उद्धव ठाकरे यांचा चेहरा म्हणूनच त्यांच्याकडे जाते. चांगल्या आणि वाईट अर्थाने त्यांनी शिवसेनेला सदा चर्चेत ठेवले. असा मोहरा Municipal Council and Nagar Panchayat elections निवडणुकांच्या ऐन रणधुमाळीत मैदानात नाही, याचा उबाठाला नक्कीच फटका बसणार आहे. राऊत यांना नक्की काय झाले हे अजून बाहेर आलेले नाही. मात्र, त्यांची जागा कोण घेणार याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे. आंदोलनाचा विषय येतो तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे मुळात विरोधी पक्षच उरला नाही. आंदोलन करणार कोण? जनतेची लढाई लढणे हा मूळ धर्म विरोधी पक्ष विसरले. आताही आंदोलनं होतात; पण ती टीव्हीवरच्या कॅमेर्यापुरती. कॅमेरे बंद झाला की आंदोलन संपते. पूर्वी जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदी नेते लाठ्या खात रस्त्यावर आडवे होत. आताच्या हायफाय आंदोलकांना साधेही खरचटत पण म्हणून आंदोलनं संपली अशातला भाग नाही. आंदोलनं होतात. विरोधी पक्ष त्यात उतरतच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल तीन वर्षे आंदोलन केले. पण विरोधी पक्षाने बघ्याचीच भूमिका घेतली. बच्चू कडू यांच्या शेतकर्यांच्या ताज्या आंदोलनात विरोधकांनी झोकून देणे अपेक्षित होते, पण विरोधी पक्ष अलिप्त राहिले. त्यामुळे अपेक्षित मिळत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी निघालेला जीआर फुसका निघाला आणि कडू यांच्या हाती कर्जमाफीचे गाजर आले. अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात भाजपा पूर्ण ताकदीने उतरला होता. लोकचळवळ उभी करण्याकरिता प्रचंड मेहनत करावी लागते. तसली आंदोलन हल्ली दुर्मिळ झाली आहेत.
९८२२२६२७३५
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)