प्रदीप पडोळे यांचा भाजपाच्या संघटनात्मक सर्व पदांचा राजीनामा

07 Nov 2025 13:52:04
तुमसर, 
pradeep-padole-resigns-from-bjp संघटनेत काम करताना कधी जातीचे राजकारण मी केले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. पण आज जातीयवाद करीत असल्याचा आरोप पक्षातीलच काही लोक करीत आहे. यामुळे मी व्यथित झालो आहे. अनेक प्रकारचे आरोप माझ्यावर केलेला आहेत. त्यामुळे आत केवळ पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा मी जिल्हाध्यक्षांकडे पाठविला असून यापुढे पक्षाचे कोणतेही पद आणि जबाबदारी मी स्वीकारणार नाही. आगामी नगर पालिका अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढाविणार नसल्याचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हे सांगताना पडोळे हे भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले.
 

pradeep-padole-resigns-from-bjp 
 
होऊ घातलेल्या नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नवनवीन राजकीय घटना पुढे येत आहेत. आज भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि तुमसर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यापुढे आपण पक्षाचा प्राथमिक सदस्य या नात्याने सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि अन्य जबाबदाऱ्या पार पाडताना कधीही जातीय राजकारण केले नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन संघटन वाढीसाठी आजपर्यंत प्रयत्न करीत आलो. मात्र आज माझ्यावर जातीयवादाचा आरोप होत आहे. pradeep-padole-resigns-from-bjp जातीजातीत फूट पाडण्याचा प्रयत्न मी करतो, अशी वक्तव्य पक्षाच्याच काही लोकांकडून होत आहेतहोत आहे. आजपर्यंत निष्ठेने काम केल्याने ही गोष्ट मला प्रचंड वेदना देणारी आहे. पक्षकार्यात जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोपही माझ्यावर केला जात आहे. एकूणच माझ्याबद्दल सुरू असलेले आरोप आणि चर्चा खेदजनक आहेत. मात्र यात कुठेही पक्षाचे नुकसान होऊ नये पक्षाच्या प्रदीप पडोळे यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांच्याकडे जिल्हा कार्यकारणीतील अनेक पदांसह भाजपा राज्य परिषद सदस्य ही जबाबदारीही होती. सुरू असलेल्या चर्चा आणि लावल्या जात असलेल्या आरोपांच्या संदर्भात स्वतःची बाजू मांडताना पडोळे यांना रडू कोसळले. कार्याची अशी पावती मिळेल, असा विचार कधीही केला नव्हता असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0