वेध
प्रफुल्ल व्यास
आपण खरोखरच देवाची पूजा करतोय की, देवाच्या नावाने अधर्माचे तांडव करतोय, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आजकालही उद्भवते. उदाहरण म्हणजे- नवस फेडण्याच्या नावाखाली pratha -parampara नवजात बालकांना वेदना देण्याची प्रथा आजही अनेक ठिकाणी आहे. त्यातली एक प्रथा म्हणजे- देवाच्या कृपेची परतफेड म्हणून आई-वडील बाळाला थंड पाण्यात क्षणभर त्याप्रसंगी भोवतालचे लोक टाळ्या वाजवतात, आरती म्हणतात आणि त्या लहान जिवाचे थरथरणारे शरीर त्या सार्यांच्या श्रद्धेसाठी एक माध्यम ठरते. अशी प्रथा कोणे एके काळी देवाला प्रसन्न करण्याच्या असोशीतून सुरू झाली असेलही. त्यावेळी आणि त्यानंतरदेखील बरेच काही घडले. त्या सार्यांचा उच्चार करण्याची आता गरज नाही. कारण ते दुरुस्त होऊ शकत गतकाळात काय झाले, याची उजळणी करण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्या समाजाने अनेक अनिष्ट pratha -parampara प्रथा-परंपरा मागे सोडल्या. म्हणूनच आज भारतीयांचा बोलबाला जगभर आहे. श्रद्धा आणि संस्कृती न सोडताही हा समाज जगात नाव कमावता झाला, याचे कारण या समाजातील सामूहिक विवेकात दडलेले आहे. मात्र, आजच्या काळातही सोडलेले बाळ देवाच्या कृपेने वाचले तर देव पावतो आणि नशिबाने अपघात झाला तर देवाची मर्जी, असा प्रकार होत असेल तर ते धक्कादायक आणि धोकादायकही आहे. ईश्वरावरील श्रद्धा इतकी क्रूर आणि अमानुष असू शकत नाही. ईश्वराला फक्त माणुसकी हवी असते. माणसांचे आपसातले प्रेम हवे असते. श्रद्धेच्या नावाखाली त्याला कोणत्याही प्राणिमात्राला दिलेला चालत नाही. तरीही हे असे घडत असते तेव्हा धक्का बसतो. श्रद्धाळूंना देव पावतो, असे आपण म्हणतो तेव्हा ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवून आपले कर्म करीत असलेल्यांचे अंतिमतः कल्याण होते, असाच त्याचा साधा अर्थ असतो. पण, श्रद्धेला अविवेकाची काजळी चढते तेव्हा त्यातून अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि असे अघोरी काही तरी आणि अशा श्रद्धाभावावरच प्रश्नचिन्हे उपस्थित केली जाऊ लागतात. देवावरचा विश्वास, व्रत, उपवास आणि नवस यांमुळे अनेकांना मानसिक बळ मिळते हे खरे आहे. जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते हेही खरे. पण, नवस फेडण्याच्या नावाखाली असे काही तरी अघोरी कृत्य होत असेल तर देवही त्यांना माफ करणार नाही. नवजात बालकांचा फेडण्यासाठी केले जाणारे असले अघोरी प्रकार हे त्या कुटुंबासह सार्या समाजासाठी लांच्छनास्पद आहेत.
मध्यप्रदेशातील भैसदेही (जिल्हा बैतुल) येथे नवस फेडण्याच्या नावाखाली pratha -parampara बालकांना नदीच्या पाण्यात सोडण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे. देवावर विश्वास ठेवणे आणि देवाच्या नावाने निरागसाच्या जिवाशी खेळणे यात फरक आहे. दुर्दैवाने अंधश्रद्ध व्यक्तींना यातील फरक कळत नाही. श्रद्धा उन्नत करते तर अंधश्रद्धा अध:पतनाकडे नेते, हे अशा लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. नवस फेडण्याच्या नावाखाली बालकांना पाण्यात सोडण्यात कसलीही श्रद्धा नाही; ती मानवी मनाची भीती आणि पूर्णपणे अंधविश्वासच होय. काही परंपरा काळानुरूप बदलण्याची गरज असते. आधुनिक भारताला श्रद्धा हवी आहेच. डोळस श्रद्धा ही भारतीय समाजाची ओळख आहे, पण हा आपल्या समाजासाठी ठसठसता व्रण आहे, हेही तेवढेच खरे. नवस कोण्या एका जाती-धर्मातच केला जातो असे नाही. अडचणीत आलेली प्रत्येक व्यक्तू देवाचा धावा करते आणि इच्छा पूर्ण झाल्यावर त्याची परतफेडही करते, म्हणजे नवस फेडते. pratha -parampara सश्रद्ध असलेल्या हिंदू समाजाची प्रतिमा प्रगतिशील आणि विज्ञानवादी समाज अशी आहे. अशा समाजाला बदनाम करण्यासाठी लोक नेहमीच टपलेले असतात. त्यामुळे असे प्रकार आपल्या भोवताली कुठेही घडत असतील, नजरेस येत असतील तर ते थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदू समाजातील जाणत्या जनांची ही जबाबदारी आहे. आपला समाज प्रगत झाला याचा अर्थ प्रत्येकाच्या घरी श्रीमंती आली असा होत नसतो. समाज तेव्हाच खर्या अर्थाने प्रगत होतो, जेव्हा तो मागे सोडून इष्टाचा स्वीकार करतो आणि इष्टाचा स्वीकार हीच खरी ईश्वरी आराधना आणि हीच खरी श्रद्धा होय.
९८८१९०३७६५