जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना ६३८१५ लाखांचा निधी मंजूर

07 Nov 2025 19:41:00
रबी हंगामासाठी होणार बियाण्यांची तरतूद 
यवतमाळ, 
राज्यातील विविध जिल्ह्यात Rabbi fund approved खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व बाधित शेतकर्‍यांना रबी हंगामासाठी तरतूद करता यावी, यासाठी शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ६३,८१५.८२ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते ऑक्टोबर या काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशू हानी, घरांच्या पडझडीसह साहित्यांचे मोठे झाले होते.
 
 
money
 
त्या अनुषंगाने आपत्ती प्राधिकरणाच्या नियमांनुसार नुकसान भरपाई म्हणून यवतमाळ जिल्ह्यासाठी हा Rabbi fund approved  निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५ लाख २३ हजार ३४५ शेतकर्‍यांच्या ६ लाख ३८ हजार १५८.१० हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे ३ हेक्टर मर्यादेत रबी हंगामातील बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरीता मदत देण्यात आली. ४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार डीबीटी पोर्टलद्वारे हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Powered By Sangraha 9.0