स्काय इंटरनॅशनल स्कूलचा सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटरला अभ्यासदौरा

07 Nov 2025 20:09:38
यवतमाळ, 
स्वामी विवेकानंद यांच्या ‘बल हेच जीवन’ या प्रेरणादायी विचाराच्या अनुषंगाने Sky International School स्काय इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी सामका आयुर्वेद योग व वेलनेस गोधनी येथे शैक्षणिक अभ्यासदौरा केला. विद्यार्थ्यांना येथे आयुर्वेद, योग, औषधी वनस्पती आणि निसर्गोपचार याविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. या अभ्यास दौर्‍यात विद्यार्थ्यांनी सामका आयुर्वेदच्या नक्षत्र वनपरिसरातील २७ नक्षत्रांनुसार लावण्यात आलेल्या पवित्र व औषधी वनस्पतींचे दर्शन घेतले. प्रत्येक वनस्पतीच्या आरोग्यदायी गुणधर्मांची सविस्तर माहिती वैद्य पंकज पवार यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेद केवळ उपचारपद्धती नसून जीवनशैली आहे, हे समजावून सांगितले.
 
 
sky
 
वैद्य पंकज पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले बल हेच जीवन, दुर्बलता हेच मरण हे प्रत्येकाच्या आयुष्यात लागू आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढविण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान आणि आयुर्वेद या चारही घटकांचा संगम आवश्यक असल्याचे सांगितले.
 
 
Sky International School  यावेळी आरोग्य, पर्यावरण आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवला. दौर्‍याच्या शेवटी वैद्य पंकज पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना १२ जानेवारी रोजी होणार्‍या स्वामी विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या उपक‘मामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरेतील आयुर्वेद आणि योग यांविषयी नवा उत्साह निर्माण झाला असून, बल, आत्मविश्वास आणि हीच खरी शिक्षणाची मूळ तत्त्वे आहेत, असा संदेश या भेटीतून देण्यात आला.
Powered By Sangraha 9.0