हिंगणघाट,
hinganghat-news : येथील दोन वेगवेगळ्या परिवारातील दोन तरुण युवकांची प्राणज्योत मालवली गेल्याने व दोघेही आपआपल्या कुटुंबातील एकमेव आधारवड असल्यामुळे या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यत होत आहे. येथील प्रतिष्ठित कापड व्यवसायिक वर्धमान रेडिमेडचे संचालक विनोद कुमार पितलिया यांचे पुत्र विशाल (३५) याचे वलसाड गुजरात येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशाल एकुलता एक मुलगा होता.
येथील गिमा टेसटाईल कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी वल्लभदास दमानी यांच्या मुलगा प्रियांक (३०) याचे अल्प आजाराने निधन झाले. त्याच्यावर मूळ गाव निमगाव, नांदुरा जि. बुलढाणा येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले. प्रियांक अविवाहित होता व आई -वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.