वंदे मातरम्च्या सार्ध शताब्दीनिमित्त समूह गाण

07 Nov 2025 20:30:57
वर्धा,
wardha-news : वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्धेसह जिल्ह्यातील तालुयात आज ७ रोजी सकाळी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. वर्धा शहरात सोडून अन्य ठिकाणी कार्यक्रम दर्जेदार झाला, हे उल्लेखनिय! वर्धा शहरात पांडुरंग सदाशिव खानखोजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केसरीमल कन्या विद्यालयाच्या मैदानावर सामुहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 


kl
 
 
अध्यक्षस्थानी तहसिलदार संदीप पुंडेकर होते तर वुमेन्स शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माधव पंडित, सचिव अ‍ॅड. संध्या पुरेकर, प्राचार्य महाजन, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक निता औघड, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी, आयएमसीचे अध्यक्ष दिलीपकुमार यांची उपस्थिती होती. प्रमुख वते म्हणुन अतुल शेंडे यांची उपस्थिती होती.
 
 
यावेळी अतुल शेंडे यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदेमातरम् या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणा स्त्रोत बनले होते. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली या गिताची रचना केली होती. आज या गीताला १५० वर्ष पूर्ण झाले असून या गीतामुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सेनानींमध्ये स्वातंत्र्याप्रती चेतना जागविण्याचे या गीताने केल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी जाहीर नाराजी व्यत केली, हे उल्लेखनिय!
 
 
यावेळी केसरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् तर न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानावर पथनाट्य सादर केले.
 
 
कार्यक्रमाला निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, भरत ज्ञान मंडळचे सचिव संजय जलताडे, गड किल्ले संवर्धन समितीचे सदस्य रजन बत्रा, उद्योजक हरिष हांडे, प्रेरणा महिला बचत गटाच्या श्रेया देशमुख,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उन्हात बसवण्यात आल्याने कार्यक्रमस्थळी नाराजी व्यत करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0