अनिल कांबळे
नागपूर,
अनाथ मुलाला घरात आधार दिल्यानंतर त्याने मुलीचे आंघाेळ करताना फोटाे आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तिला फोटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन Women's Crime ब्लॅकमेल करुन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ताे सतत लैंगिक अत्याचार करीत असल्याने त्रस्त झालेल्या तरुणीने त्याच्याविरुद्ध पाेलिसात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपी तरुणाला अटक केली. मयूर येवले (32) रा. प्रेमनगर असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
Women's Crime पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 20 वर्षीय तरुणी पदवीची विद्यार्थिनी असून ती तहसील हद्दित आईवडिलांसह राहते. आराेपी मयूर येवले याच्या वडिलांशी पीडितेच्या वडिलांची जुनी आणि घनिष्ट मैत्री हाेती. तेव्हा दाेघेही ते एकमेकांच्या घरी ये-जा करीत हाेते. काैटुंबिक संबंध असल्यामुळे मुलगा मयूरसुद्धा ओळखत हाेता. गेल्या काही महिन्यांपूर्वी मयूरच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून ताे घरी एकटाच राहत हाेता. तरुणीचे वडिल त्याच्या भेटीला नेहमी येत हाेते आणि त्याला आधार देत हाेते. त्याला अनेकदा जेवण करायला घरी नेत हाेते. गेल्यावर्षी जुलै महिन्यात एका अपघातात मयूर जखमी झाला हाेता. त्याची देखभाल करणारे काेणीही नसल्यामुळे पीडितेच्या वडिलांनी त्याला घरी आणले. तेव्हापासून ताे पीडितेच्या घरीच राहात हाेता. अपघातातून बरा झाल्यानंतर ताे तेथेच राहून काम करीत हाेता. यादरम्यान, त्याची तरुणीवर वाईट नजर गेली. मात्र, ती मित्र म्हणून त्याच्याशी बाेलत हाेती. काही दिवसांपूर्वी ती तरुणी बाथरुममध्ये आंघाेळ करीत असताना मयूरने खिडकीतून माेबाईलने तिचे अश्लील फोटाे काढले. साेशल मीडियावर फोटाे व्हायरल करण्याची धमकी देऊन ताे पीडितेचे लैंगिक शाेषण करू लागला. आराेपीच्या सततच्या छळाला कंटाळऊन तिने पाेलिसात तक्रार केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन आराेपी मयूर येवलेला अटक केली.