जम्मू-कश्मीर,
Keran Sector encounter कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान भीषण चकमक झाली. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे.
अधिकृत Keran Sector encounter सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरन सेक्टरमध्ये सैन्य आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिम सुरू केली होती. या दरम्यान जवानांनी काही संशयास्पद हालचाल ओळखली आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलांनी कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीनंतर परिसरात आणखी कोणी लपलेले नाही याची खात्री करण्यासाठी सखोल तपासणी सुरू आहे.दरम्यान, अलीकडेच श्रीनगर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. ममता चौक, कोनाखान आणि डलगेट परिसरातून गुरुवारी उशिरा रात्री या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची ओळख शाह मुतैयब आणि कामरान हसन शाह (दोघेही निवासी कुलीपोरा खानयार) तसेच मोहम्मद नदीम (मूळचा मेरठ, सध्या खानयारच्या कावा मोहल्ल्यात वास्तव्यास) अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून एक देसी कट्टा आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याच महिन्याच्या Keran Sector encounter सुरुवातीला किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात झालेल्या चकमकीतही एक जवान जखमी झाला होता. गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हालचालींमध्ये वाढ होत असल्याचे सुरक्षा संस्थांचे निरीक्षण आहे.गेल्या आठवड्यात मिळालेल्या गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटना जम्मू-कश्मीरमध्ये नव्याने हल्ल्यांची योजना आखत आहेत. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेनंतर गेल्या सहा महिन्यांपासून दहशतवादी संघटना दबल्या गेल्या होत्या. मात्र, आता पुन्हा सक्रिय होण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.सुरक्षादलांनी या पार्श्वभूमीवर सर्व सीमावर्ती भागांमध्ये कडक नजर ठेवली आहे. ‘दहशतवादाविरोधी शून्य सहनशीलता’ या धोरणाखाली प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असून, देशविरोधी शक्तींना कठोर उत्तर देण्याची तयारी सुरक्षाबलांनी दाखवली आहे.