घरात सुरु महिलेचे समलिंगी संबंध... बाळाची हत्या.. खरे कारण समोर

08 Nov 2025 10:00:16
तामिळनाडू,
Tamil Nadu baby murder तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील केलामंगलम येथील एका धक्कादायक घटनेत एका ५ महिन्यांच्या बाळाची आईनेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली असून, बाळाच्या वडिलांना मुलाच्या मृत्यूबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
 
 

 Krishnagiri infanticide, Tamil Nadu baby murder, 
पोलिस तपासात उघड झाले की, भारती आणि तिची समलिंगी पार्टनर सुमित्रा (२२) यांनी मिळून हा खून केला होता. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. आरोपी महिला केलीमंगलमजवळील चिन्नट्टी गावाच्या रहिवाशा आहेत.
एस भारती (वय ३८) Tamil Nadu baby murder यांचे लग्न सुरेश (वय ३८) यांच्याशी झाले आहे. त्यांना आधीपासून ५ आणि ३ वर्षांच्या दोन मुली आहेत, तर ५ महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगा झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, भारतीला सुमित्रासोबत समलिंगी संबंध होते. सुरेशला या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर घरात तणाव आणि भांडण सुरु झाले. या भांडणानंतर भारती काही दिवस कुंथुमारनपल्ली गावात तिच्या आईच्या घरी राहिली, पण नंतर आईच्या समजावणीनंतर तिला सासरी परत पाठवण्यात आले.घटनेच्या दिवशी, सुरेश आणि कुटुंबातील इतर सदस्य कामावर गेले होते. या वेळेत भारतीने आपल्या ५ महिन्यांच्या बाळाचा खून केला. सुरेश घरी परतल्यावर भारतीने त्याला सांगितले की बाळाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी भारतीवर विश्वास ठेवून बाळाचे अंतिम संस्कार केले. मात्र, मुलाच्या वडिलांना काहीतरी संशय वाटल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
 
 
मंगळवारी सुरेश पोलिस ठाण्यात धाव घेत मुलाच्या संशयास्पद मृत्यूची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात भारती आणि सुमित्रा यांचा समलिंगी संबंध व भांडणाची पार्श्वभूमी यांचा पत्ता लावला. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली असून, या घटनेच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे.
ही घटना घरातील तणाव, समलिंगी संबंध आणि मानसिक संघर्ष यामुळे घडलेल्या भयावह कृत्याची दाखल देणारी उदाहरण ठरली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिसरातील सुरक्षिततेसाठी दक्षता घेतली असून, आरोपींविरोधात योग्य कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0