अलर्ट जारी! पाच राज्यांमध्ये २४ तास धोक्याचे

08 Nov 2025 10:12:16
मुंबई,
weather alert महाराष्ट्रात यंदा थंडी दरवर्षीच्या तुलनेत उशीरा सुरू झाली आहे. पहाटे थंडी जाणवत असली, तरी दुपारी उकाड्याचा अनुभव लोकांना होत आहे. राज्यात कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात घट होत असून, खास करून खानदेशसह राज्याच्या उत्तरेकडील भागात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या खाली उतरले आहे. यामुळे परिसरात गारठा जाणवू लागला आहे.
 
 

weather alert 
तथापि, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास महत्त्वाचे ठरले आहेत. हवामान खात्याने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अंदाजानुसार, पुढील २४ तासांत चार ते पाच राज्यांमध्ये हवामानात सतत बदल होऊ शकतो. विशेषतः केरळमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आंध्र प्रदेश, रायमसिला तसेच ईशान्य भागात वादळासह पावसाचे मोठे संकेत आहेत.
राज्यात आज weather alert  मुख्यतः कोरडे हवामान कायम राहील, परंतु तापमानात चढउतार पाहायला मिळेल. दुपारच्या वेळी पारा ३० अंशांच्या आसपास जाईल, तरीही घटती तापमानाची स्थिती जाणवेल. ब्रह्मपुरी येथे शुक्रवारी सकाळपर्यंत कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले.हवामान खात्याने हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पर्वतीय वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याचे संकेत दिले आहेत. शनिवार आणि रविवारपर्यंत या भागात थंडी अधिक वाढेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.याव्यतिरिक्त, पुढील २४ तासात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अंदमान व निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अल्पसंख्य प्रमाणात इशारा देण्यात आला आहे, परंतु वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तापमानातील चढउतार आणि हवामानातील बदल कायम राहतील.लोकांनी थंडी आणि उकाड्याच्या या चढउताराशी जुळवून स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांनी गरम कपडे वापरणे, तसेच पावसाळा हवामान लक्षात ठेवून बाहेर पडणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0