परपुरषाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीने नवऱ्याचा घेतला जीव!

08 Nov 2025 18:00:13
मेरठ,
wife-kills-husband : मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रोहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, गेल्या आठ महिन्यांत पत्नीकडून झालेल्या पतींच्या खुनाची ही चौथी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
MURDER
 
 
मृत पतीचे नाव अनिल असून, काही दिवसांपूर्वी तो नहरात बुडून मरण पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तपासादरम्यान पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटली. सखोल चौकशीनंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले.
 
एसपी देहात अभिजीत कुमार यांनी सांगितले की, आरोपी पत्नी काजल हिने चौकशीत कबुली दिली आहे की, तिचा तिच्या जुन्या प्रियकराशी पुन्हा संपर्क झाला होता आणि दोघांनी अनिलला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. योजनेंतर्गत काजलने आधी पतीला नशेचे औषध दिले आणि मग चुन्नीने गळा आवळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर दोघांनी मिळून अनिलला नहरात फेकून दिले, जिथे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, हत्या आणि कट रचल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0