Facebook-Instagram वरील फ्रॉड जाहिरातींवरून Metaची अरबोंची कमाई!

08 Nov 2025 17:30:40
नवी दिल्ली,
Meta revenue from fraudulent ads : सोशल मीडिया दिग्गज कंपनी Meta पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड्स आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने फसव्या आणि बंदी असलेल्या जाहिराती दाखवून तब्बल १,४१९ अब्ज रुपयांची कमाई केल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे.
 

META
 
 
रॉयटर्सच्या अहवालानुसार, मेटाने आपल्या उत्पन्नातील जवळपास १० टक्के हिस्सा (१६ अब्ज डॉलर) हे अशा फसव्या जाहिरातींमधून मिळवला. कंपनीच्या इंटरनल डॉक्युमेंटनुसार, तीन वर्षांहून अधिक काळ मेटा फेक ई-कॉमर्स, बनावट गुंतवणूक योजना, अवैध ऑनलाइन कॅसिनो आणि बंदी घातलेल्या औषधांच्या जाहिराती ओळखण्यात अपयशी ठरली.
 
दररोज १५ अब्जहून अधिक हाय-रिस्क जाहिराती मेटा प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जात असल्याचेही समोर आले आहे. या जाहिरातींपासून कंपनी दरवर्षी अंदाजे ७ अब्ज डॉलरची कमाई करते. विशेष म्हणजे, कंपनीचा ऑटोमेटेड सिस्टीम केवळ ९५ टक्के खात्री झाल्यानंतरच अशा जाहिरातींना बंदी घालतो.
 
तथापि, मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी हे आरोप “भ्रामक” असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, १० टक्के उत्पन्न फसव्या जाहिरातींतून आल्याचा अंदाज अतिशयोक्तीपूर्ण आहे आणि बहुतेक जाहिराती वैध होत्या. मात्र, कंपनीने फसव्या जाहिरातींची अचूक संख्या स्पष्ट केलेली नाही.
Powered By Sangraha 9.0