तभा वृत्तसेवा
उमरखेड,
abasaheb-babasaheb-temple : श्री आबासाहेब बाबासाहेब मंदिर पदयात्रेत दिड हजार भाविक, साधू, संत, भिक्षूक, वासनिक, उपदेशी व नामधारक सहभागी झाले होते. ही पदयात्रा बाराखांडीचे दर्शन घेणार आहे.
महानुभाव पंथीय जागृत देवस्थान श्री आबासाहेब व बाबासाहेब मंदिर जंगलात आहे. हे मंदिर दोन्ही देवाच्या भेटीचे स्थान आहे. दहेली, मन्हाळी, चुरमुरा, ढाणकी, विडूळ, उमरखेड, कुपटी, पार्डी, मुळावा, गंगणमाळ, अंबाळीवरून यात्रेकरू मंदिरात दाखल झाले होते. श्रीच्या विशेषाचे मंगलस्नान, उटी, उपहार, पारायण, नामस्मरण, प्रवचन, भोजन असा कार्यक्रम झाला.
या मंदिराचा जिर्णोद्धार देवदत्त आश्रम जाधववाडी पुणेचे संचालक महंत वैराग्यरत्न मोठेबाबा नरेंद्रमुनी अंकुळनेरकर यांनी केला. जंगलात मंदिराचे बांधकाम झाले विजेची व पाण्याची व्यवस्था झाली, येणाèया-जाणाèयांसाठी रस्ता झाला. मंदिराचे व्यवस्था डॉ. अनंतराज अंकुळनेर करीत आहेत. सर्वज्ञ प्रतिष्ठान आयोजन मंडळाने सुरू केलेल्या पदयात्रेत महंत राहेरकर बाबा, महंत कांरजेकर बाबा, महंत भोजराजबाबा अमृते, महंत दामोदरबाबा आदिक, महंत नांदेडकर बाबा यांनी प्रवचन केले.
सर्वज्ञ प्रतिष्ठाने श्री दतात्रेय प्रभू महाराजांच्या बाराखांडीच्या विशेषाचे दर्शन घेण्यासाठी पदयात्रा काढली. परमेश्वर पदयात्रेचे मनोकामना पूर्ण करो, हीच परमेश्वराला प्रार्थना.
- महंत वैराग्यरत्न (मोठेबाबा)
अंकुळनेरकर जाधवाडी, जि. पुणे.