तिरोडा,
accident : मंडई उत्सवात सहभागी होणासाठी जाणार्या वाहनाला अपघात झाला. यात चालकासह 20 जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील धादरी मार्गावर आज 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात एक 10 वर्षीय मुलगा गंभिर असल्याचे सांगीतले जाते.
तिरोडा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात सध्या मंडई उत्सवाची धूम आहे. गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने सांसकृतिक कार्यक्रम व लोककला म्हणून पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या दंडारीचे सादरीकरण केले जाते. आज 9 रोजी गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे मंडईचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 3 च्या सुमारास धादरी येथील दंडार मंडळ कलाकार व वाद्यमंडळींसह एकोडीच्या दिशेने मालवाहतुक करणार्या वाहनाने निघाले असता धादरी गावापासून काही अंतरावर वाहनचालकाने ब्रेक लावल्याने वाहन अनियंत्रित होत उलटले. यात चालकासह वाहनातील 20 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. एक 10 वर्षीय मुलाचे हात मोडल्याचे सांगीतले जाते. वत्त लिहेपर्यंत पोलिसात घटनेची नोंद झाली नव्हती.