बंदुकीच्या धाकावर सीताबर्डीतून अपहरण करून बलात्काराचा आरोप

09 Nov 2025 13:04:31
अनिल कांबळे
नागपूर, 
accused-of-kidnapping-and-rape मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॅालला गेलेल्या महिलेचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून एका अज्ञात ठिकाणी नेऊन कारमध्ये बलात्कार करण्याच्या आरोपांमधून सबळ पुराव्यांअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. नानक लालताप्रसाद यादव असे निर्दोष व्यक्तीचे नाव आहे.
 
 
accused-of-kidnapping-and-rape
 
या प्रकरणी सर्व साक्षीपुरावे तपासून न्या. श्रीमती एस. पी. पोंक्षे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तक्रारदार महिला २०१७ मध्ये ॲाटोने आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॅाल येथे डबा देण्यासाठी गेलेली होती. डबा देऊन बाहेर पडत असताना एका इसमाने कारने तिचा पाठलाग केला व मॅालसमोर बंदुकीच्या धाकावर तिचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन कारमध्ये बलात्कार केला व घटनेची व्हीडीओ चित्रफीत तयार करून समाजात बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कपीलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. accused-of-kidnapping-and-rape सरकारी पक्षाने तक्रारदार, तिची मुलगी, मुलगा, पंच साक्षीदार आणि तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवली. आरोपीच्यावतीने ॲड. मंगेश डी. राऊत यांनी साक्षीदारांचा उलटतपास घेतला. सर्व साक्षपुरावे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका केली. आरोपीच्या वतीने ॲड. मंगेश राऊत यांनी बाजू मांडली असून ॲड. नाझीया पठाण यांनी त्यांना सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0