आष्टीत आठवड्यापासुन कचरा संकलन बंद

09 Nov 2025 19:18:25
तळेगाव (श्या.पंत), 
ashti-garbage-collection-stop : आष्टी नगरपंचायतमध्ये गेल्या सात दिवसांपासून कचरा संकलन करण्याचे काम बंद असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेे येथील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी नगरपंचायतचे अभियंता निखील पाटील यांच्या मार्फत मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले. येत्या ७ दिवसात कचरा संकलन करण्याचे काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
 
 
k
 
आष्टी शहराची लोकसंख्या ही कमी असून सुद्धा वार्षिक ८७ लाख रुपयाचे कंत्राट कचर्‍याकरिता देण्यात आले. ३२ मजूर रोज ३४० रुपये चार चालक पकडून, चार वाहनांचे डिसेल प्रतिदिन २ हजार रुपये, ट्रॅटर ३० हजार रुपये मासिक भाडे याचा वार्षिक खर्च ५० लाख असून ३७ लाख अतिरित खर्च करण्यात आले असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
 
 
यावेळी नगरसेवक अ‍ॅड. मनिष ठोंबरे, माजी नगरसेवक अजय लेकुरवाडे, उत्तम बरगे, नरेंद्र भनेरकर, विजय खांडेकर, निरज भार्गव, अतुल गुल्हाने, अमर टेकाम, आवेज खान, सागर सिनकर, नजीम अली, सचिन पाचघरे, विवेक बिजवे, सौरभ तायडे, मंगेश शिरभाते, सचिन नासरे, फिरोज भाई, साकिब खान अक्रम अली, नितीन बुरटकर, सचिन वीरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0