महिला सहकारी बँकेच्या ठेविदारांच्या खात्यात पैसे जमा

09 Nov 2025 21:30:10
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Balasaheb Mangulkar : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या ठेविदारांच्या खात्यात पैसे जमा होत आहे. यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्या प्रयत्नांना हे पैसे जमा होत असल्याची माहिती शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकाèयांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
y9Nov-Mahila
 
पुढे बोलताना पदाधिकारी म्हणाले, बाबाजी दाते सहकारी बँकेवर नोव्हेंबर 2021 रोजी आरबीआयने निर्बंध लादले. 2022 पासून बँकींग परवाना रद्द केला असून बँकेवर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली.
अवसायन प्रक्रियेदरम्यान डीआयसीजीसीने दावा परतावा रक्कम 294 कोटी संपूर्ण अदा करण्यात येवून अवसायकाकडे 39.37 कोटी तरलता शिल्लक होती. ते 39.37 कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात दिवाळी पूर्वी जमा न झाल्यास विधानभवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा आमदार बाळासाहेब मांगूळकर यांनी दिला होता.
 
 
दिवाळीपूर्वी ठेवीदारांना ठेवीची रक्कम न मिळाल्यामुळे ठेवीदारांमध्ये असंतोष निर्माण होऊन ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने उपोषण सुरु केले होते. या उपोषणाला आमदारांनी भेट दिली होती. आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्यामुळेच आम्हाला पैसे मिळाले आहे. तरीही अद्यापहीपूर्ण पैसे मिळाले नसल्याने या विरोधात आंदोलन उभारु असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रेखा बुटले, मंगला बोकळे, जयवंती पातोडे, प्रभाकर मालेकर, विनाद खर्चे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0