भारत विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनी

09 Nov 2025 20:22:44
हिंगणघाट, 
book-exhibition : वाचनाशिवाय पर्याय नाही, विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महावाचन उत्सव- २०२५ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत विद्यार्थ्याचे मन पुस्तकाकडे आकृष्ट करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा या उद्देशाने भारत विद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक हरीश भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षक निलाक्षी बुरिले, मनिषा कोंडावर, विनोद नांदुरकर, गजानन मेघरे, दत्ता भांगे, ग्रंथपाल विकास नागरकर, श्रीकांत राडे आदी उपस्थित होते.
 
 
jk
 
याप्रसंगी मुख्याध्यापक हरीश भट्टड म्हणाले, शालेय ग्रंथालय समृद्धीचा खरा आधार असून ते आपल्याला वैचारिक संपन्नतेकडे घेऊन जातात. विज्ञानयुगात स्मार्ट फोनच्या जमान्यातही पुस्तके आणि ग्रंथालय यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. व्यतींचा वैचारिक विकास करण्याचे काम फत पुस्तकेच करू शकतात. त्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
या ग्रंथप्रदर्शनीत ग्रंथालयातील कथा, कादंबरी, बाल साहित्य, किशोर साहित्य मराठी व इंग्रजी शब्दकोश, विश्वकोश, क्रीडा, दुर्मिळ वाचनीय पुस्तके, मासिके, वैज्ञानिक, स्पर्धा परीक्षा पुस्तके, शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या माहितीची पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, बोधकथा व गोष्टींची पुस्तके, कविता संग्रह या सर्व पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तके कशी हाताळावी याचे महत्त्व ग्रंथपाल विकास नागरकर यांनी समजावून सांगितले.
 
 
या ग्रंथ प्रदर्शनीला महंत सुरेशशास्त्री महाराज, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर,गटविकास अधिकारी सावसाकडे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी टाकळे, संत नगाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे मुख्याध्यापक तुषार लोखंडे, समीर धारकर, पत्रकार सतीश वखरे आदींनी भेट दिली.
Powered By Sangraha 9.0