कत्तलीसाठी जाणारा गुरांचा ट्रक पकडला

09 Nov 2025 20:21:14
तळेगाव (श्या. पं.), 
cattle-truck-seized : गोवशांच्या अवैध वाहतुकीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कारवाई करत पहाटे जनावरांना कत्तलीसाठी नेत असलेला ट्रक पकडून ३८ गोवशांची सुटका केली. यात वकील हुसेन शेख (४५) रा. टेका नाका नागपूर, याला अटक केली असून दोघे पसार झाले. ही घटना आज रविवार ९ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.
 
 
k
 
पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ४०- बी. जी. ८६१७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ३९ गोवंश कोंबून भरले होते. ट्रकमध्ये जनावरांची कोंडी झाल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर उर्वरित ३८ जनावरांना पोलिसांनी गोरक्षण केंद्रात हलविले. ट्रकमधील जनावरं नागपूर येथून लालखेडी जि. अमरावती येथे कत्तलीसाठी नेली जात होती. पोलिसांनी ट्रक व गोवंश असा १३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार, अतुल अडसड, निखिल काळे, चंदन ठाकूर, निखिल मडसे, रणजित बागडे, अंकुश कुरवाळे, नदीम व सचिन ढाले यांच्या पथकाने केली.
Powered By Sangraha 9.0