तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘ब’ मंडळ समूपदेश येथे सरकारी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल आदिवासी समाजाच्या वतीने शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी त्यांचा यवतमाळ येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमके कोडापे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब येलके, सुरेश कन्नाके, राजू चांदेकर, नरेश गेडाम, सुरेश चिंचोळक, सुरेश मेश्राम, मनीषा तीरानकर, अॅड. प्रमोद घोडाम, राजू मडावी, श्रीधर कनाके, शैलेश गाडेकर, डॉ. मोहन गेडाम, प्रल्हाद शिडाम, डॉ. मधुकर उईके, विनोद मडावी, डॉ. ताराचंद गेडाम, डॉ. शितल चंद्रशेखर मडावी, प्रा. देवानंद सावरकर, प्रा. अविनाश मसराम, प्रा. प्रफुल आडे, किशोर उईके, प्रा. महेश शिडाम यांची उपस्थिती होती.
आदिवासी विकास परिषद यवतमाळ, बिरसा फोरम महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया एम्पलॉइज फेडरेशन यवतमाळ, कोया पुनेम गोटूल समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना यवतमाळ, आदिवासी कर्मचारी संघटना, परधान समाज संघटना, संघटना श्यामा दादा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, आंध समाज संघटना, पारधी समाज संघटना व इतर संघटनांच्या प्रमुख पदाधिकाèयांच्या अॅड. प्रियदर्शनी उईके यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू मडावी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी भारताच्या संविधानाबद्दल विस्तृत असे विवेचन केले व उच्च न्यायालयामध्ये अॅड. प्रियदर्शनी उईके यांना मिळालेले पद हे किती महत्त्वाचे आहे या महत्त्वाच्या पदावर आदिवासी समाजातील उच्च विद्या विभूषित युवतीची पहिल्यांदाच निवड झाल्याबद्दल तीचे अभिनंदन केले. तसेच हा संपूर्ण आदिवासी समाजाचा गौरव आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन तुषार आत्राम यांनी केले. तर आभार बंडू मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाकरिता नंदू अरके, संगीता मेश्राम, किशोर सलामे, बाळू वट्टी, शाहू कनाके, दिनेश मडावी, अरुण मेश्राम, देवानंद सोयाम, लखन आत्राम, दिनेश उईके, लोभेश कुळसंगे, लक्ष्मण आस्वले, सचिन मुनेश्वर, प्रदीप कुमरे, आकाश गेडाम, विकास कासार, रघु गुजराती, रोहन मोरे यांनी परिश्रम घेतले.