देवळी पुलगाव मतदार संघातील शेतकर्‍यांना १५१ कोटीची मदत

09 Nov 2025 20:36:53
देवळी, 
rajesh-bakane : देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता याकरिता दिलासा देणारा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला. देवळी-पुलगाव मतदार संघातील शेतकर्‍यांना १५१ कोटीची मदत दिल्या गेली असल्याची माहिती आ. राजेश बकाने यांनी आज रविवार ९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
 
j
 
आ. बकाने पुढे म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना १८ हजार ५०० रुपये प्रती हेटर ३ हेटरपर्यंत मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार हेटरी ८ हजार ५०० रुपयांची ३ हेटरपर्यंतची मदत बहुतांश शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली आहे. यासोबतच रब्बी हंगामासाठी ८५ कोटीची प्रती हेटर १० हजार रुपये ३ हेटरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही मदत दोन, तीन दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आ. बकाने यांनी सांगितले.
 
 
भिडी, अंदोरी आणि आंजी (मोठी) या तीन मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने येथील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक निर्णयाकडे लक्ष वेधून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश येऊन या ३ मंडळांसाठी अतिरित १५ कोटी रुपयांची मदत प्रशासनाने मंजूर केली असल्याचे आ. बकाने यांनी सांगितले.
 
 
ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकर्‍यांच्या दुःखावर सरकारचा मायेचा हात आहे. महायुती सरकार हे खरोखरच शेतकरीहिताचे सरकार आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही फत शब्दाने नाही तर कृतीने उभे आहोत. देवळी-पुलगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी व्हावा हा आमचा प्रयत्न सतत सुरू राहील. सरकारच्या या निर्णयामुळे देवळी-पुलगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांना १५१ कोटी ४० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळेल असा विश्वास आ. राजेश बकाने यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0