बुलढाणा,
explosion-at-gas-welding-shop : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागे एका गॅस वेल्डिंगच्या टपरीत स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी घडली. शहरातील बस स्टैंड परिसराजवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागे काही गॅरेजचे दुकान आहे. त्या ठिकाणी अरबाज गॅस सर्व्हिस दुकान आहे. त्यामध्ये सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये पुर्ण दुकान जळून खाक झाले आहे. त्यामध्ये एका अज्ञाताने दुकानावर टायर फेकले होते. या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दााखल झाले. अग्निशमन दलाने आग विझवली. यामध्ये सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही. शेख अरबाज शेख मेहबूब यांचे यामध्ये ५० ते ६० हजारांचे नुकसान झाले आहे.