त्या वगळलेल्या ५ मंडळातील शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा

09 Nov 2025 19:10:49
समुद्रपूर,
sameer-kunawar : वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गावात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमानाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपासी व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्तासाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून तालुयातील ५ मंडळ वगळले होते. याची माहिती मिळताच आ. समिर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री, पुनर्वसन मंत्र्यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा करून सुटलेल्या गिरड, कोरा, समुद्रपूर, वायगाव (गोड) पाईकमारी या मंडळाचा समावेश करून घेतला असून या शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामा करिता हेटरी १० हजार मदतीचे तालुयासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहे.
 

samir  
 
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्तासाठी पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये समुद्रपूर तालुयाचा समावेश केल्याने शेतकर्‍यांमध्ये मदतीची आशा पल्लवित झाली होत्या. मात्र, गिरड, कोरा, समुद्रपूर, वायगाव हळद्या, पाईकमारी या मंडळाला ६५ मिली मिटर पाऊस कमी पडल्याचे कारण पुढे करून या मंडळांना वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या पाचही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याची बाब आ. कुणावार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून माहिती जमा करून सुटलेल्या ५ मंडळातील शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन ५ मंडळांचा अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश करण्याचा विषय लावून धरला. त्यानंतर सुटलेल्या ५ मंडळाचा समावेश अतिवृष्टी पॅकेजमध्ये करण्यात आला. या मंडळातील शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ४ नोव्हेंबरला रब्बी हंगामा करिता हेटरी १० हजार मदतीचे तालुयासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहे. त्यामुळे आ. कुणावार यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
 
 
गिरड, कोरा, समुद्रपूर, वायगाव (गोड) पाईकमारी या मंडळला वगळल्याचा प्रश्न गंभीर होता. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट देऊन त्यांना संपूर्ण परीस्थितीची माहिती दिली. आपल्या मागणीची सरकारने दखल घेतली आणि या पाच मंडळाचा अतिवृष्टीच्या पॅकेज मध्ये समावेश करून घेतला. समुद्रपूर तालुयातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांसाठी रब्बी हंगामाकरिता हेटरी १० हजार रुपये ५० कोटी रुपयांचा मदत सुद्धा आली असल्याची माहिती आ. कुणावार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0