हिंगणघाट,
sudhir-kothari : हिंगणघाट बाजार समितीच्या आवारामधुन कापूस खरेदीचा शुभारंभ १० रोजी केला आहे अशी माहिती समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी दिली. शेतकर्यांनी खुल्या बाजारात आधारभुत दरापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे खाजगी व्यापार्यांना कापसाची विक्री न करता शासनास आधारभुत दराने कापसाची विक्री करण्याच्या दृष्टीने भारतीय कपास निगम यांचेद्वारा विकसीत केलेल्या कपास किसान अॅपवर आवश्यक ती माहिती व दस्तावेज सादर करून नोंदणी करून घ्यावी.
नोंदणीची प्रक्रिया किचकट आहे. त्यासंदर्भाने काही अडीअडचणी असल्यास समितीकडे संपर्क साधुन कपास किसान अॅपवर नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून आधारभुत दराने कापूस विक्री करणे शेतकर्यांना सोईचे होईल, असे आवाहन सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ७ रोजी प्रकाश व्हाईट गोल्ड व श्रीनिवास जिनिंग इंडस्ट्रीजद्वारे कापसाची खरेदी काटा पूजन कृउबा समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी बोलत होते. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रकाश व्हाईटगोल्ड यांचे जिनिंग प्रेसिंगमध्ये ३० वाहनांद्वारे कापूस आलेला होता. यावेळी सर्व वाहनांतील कापसाला प्रति क्विंटल ७ हजार १०१ तर श्रीनिवास जिनिंगमध्ये १५ वाहनांमधील कापसाची ७ हजार ९ रुपये दराने कापूस खरेदी करण्यात आली.
या प्रसंगी समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक मधुकरराव डंभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालीया, प्रफुल बाडे, उत्तमराव भोयर, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, पंकज कोचर, घनश्याम येरलेकर, नंदा चांभारे, सचिव टी. सी. चांभारे, खरेदीदार प्रणय डालीया, नितीन राठी व शेतकरी उपस्थित होते.