पतीनंतर पत्नीनेही सोडले प्राण

09 Nov 2025 20:39:50
समुद्रपूर, 
death-of-husband-and-wife : पती-पत्नीचे नाते हे फत एकत्र राहणेच नाही तर आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याचे असते. साथ जियेंगे, साथ मरेंगे हे वचन प्रत्यक्षात उतरवणारे हृदयस्पर्शी उदाहरण गिरड येथील घरत दाम्पत्याने घालून दिले आहे.
 
 
 jk
 
येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव घरत (७०) यांना शनिवारी दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. घरासमोर आप्तेष्टांची गर्दी, रडण्याचा आवाज आणि शोकमय वातावरण होते. पतीचा मृतदेह पाहून पत्नी शशिकला (६५) यांनी हंबरडा फोडला. पतीच्या निधनाचे दुःख त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनीही विरहात प्राण सोडले. घरत दाम्पत्याने आयुष्यभर एकमेकांच्या सहवासात जगून मृत्यूनंतरही एकत्र राहण्याचं वचन पाळलं. त्यांच्या या प्रेमकथेने गाव भावविभोर झालं.
Powered By Sangraha 9.0