नवी दिल्ली,
IND vs KUW Hong Kong Sixes : ८ नोव्हेंबर रोजी हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारत आणि कुवेत यांच्यात सामना झाला. कुवेतने भारताचा २७ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कुवेतने ६ षटकांत ५ गडी गमावून १०६ धावा केल्या. कुवेतचा कर्णधार यासीन पटेलने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. १०७ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया ६ गडी गमावून केवळ ७९ धावाच करू शकली आणि अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.