उमियाशंकर हायस्कूलमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धा

09 Nov 2025 14:56:10
नागपूर,
Umiyashankar High School लकडगंज, क्वेटा कॉलनी येथील श्री नागपूर गुजराती मंडळ संचालित श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात स्व. शांतिभाई बदानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत २७ शाळांमधील ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मनःशांती आणि शरीरासाठी योगा’ हा विषय होता. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने आकर्षक चित्रे साकारली. सी.बी. आदर्श हायस्कूलने रनिंग ट्रॉफी पटकावली.
 
Umiyashankar High School
 
प्रथम ऊर्वी कानोजे, द्वितीय मुग्धा वासुले, तृतीय शर्वरी उमरेडकर यांनी क्रमांक मिळविला. पारेख स्पोर्ट्सतर्फे स्वारंगिनी पराते, त्रिशा बोकडे आणि ओजस्विनी मुल्लेवार यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. Umiyashankar High School कार्यक्रमाला माजी महापौर दयाशंकर तिवारी, अध्यक्ष योगेश पटेल, सचिव चंद्रेश बदानी आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अंशुल जिचकार यांनी मानले.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0