जयताळा येथे सामूहिक तुळशी विवाह सोहळा !

09 Nov 2025 12:49:37
नागपूर,
Jayatala Nagpur जयताळा येथील सत्यसाई ले-आऊट परिसरात सामूहिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी मंगलाष्टक पठण, आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या सामूहिक तुळशी विवाहाने परिसरात उत्सवी आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

vevek 
 
 कार्यक्रमात सुनीता श्रीवास्तव, प्रतिमा मिश्रा, सुनंदा रिनायात, शकुंतला पवार, विजू देने, लता राऊत, मोनिका राऊत, मीनाक्षी राऊत, योगिता राऊत,Jayatala Nagpur पुस्तकला रिनायात, शुभांगी गौतम, पल्लवी कांबडे, अंशुमन मिश्रा, रोहीत श्रीवास्तव, मनीष चौधरी, आणि रमेश दहिने यांची उपस्थिती लाभली.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र
 
गांधीनगर
गांधीनगर येथील हनुमान मंदिरात तुळशी विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे यजमान धनराज चोपडे होते.कार्यक्रमाच्या वेळी मंदिराचे पदाधिकारी दत्तात्रय खरे, , विनायक खराबे, पुंडलिक मसुरकर, बाबा पानपट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
indu
 
सौजन्य:विवेक इंदुरकर,संपर्क मित्र
सप्तगिरी नगर
नरेंद्र नगर येथील सप्तगिरी नगरमध्ये तुळशी विवाह सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आनंदात पार पडला. पारंपरिक रीतीरिवाज, मंगलाष्टक पठण आणि आरतीने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले.या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी विवाह सोहळ्याचा आनंद लुटला आणि तुळशी–विष्णू विवाहाचे औचित्य साधत पारंपरिक सण संस्कृतीचा वारसा जोपासला.
 
 
ha
 
सौजन्य :उदय दिवे,संपर्क मित्र
घोगली 
 घोगली येथील प्रतिभा वारेकर यांच्या निवासस्थानी आज तुळशी विवाह सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. पारंपरिक विधी, मंगलाष्टक पठण आणि आरतीने संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले.
 
 

hapratibha 
 
 
सौजन्य: प्रतिभा वारेकर,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0