khasdar-cultural-festival-2025 खासदार सांस्कृतिक महाेत्सवाचा पहिला दिवस राममय झाल्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी तरुणाईचा लाडका गायक विशाल मिश्राने गली गली नागपूर सजायेंगे, राम आएंगे हे गीत सादर करून नागपूरकरांचे मन जिंकले. खासदार सांस्कृतिक महाेत्सव - 2025 मध्ये शनिवारी हनुमाननगरातील क्रीडा चाैक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन काॅन्सर्ट पार पडली. विशाल मिश्राला ऐकण्यासाठी तरुणाईने हाऊसुल गर्दी केली हाेती. पटांगणाच्या बाहेर देखील हजाराेच्या संख्येने लाेक जमले हाेते.
मी लहान घरातून माेठे स्वप्न बघत आलाे. मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करताे, माझा प्रत्येक शब्द, स्वर तुमच्यासाठी आहे, आयुष्यभर राहील, असे म्हणत विशाल मंचावरून खाली उतरला तेव्हा बच्चेकंपनींनी त्याच्या भाेवती गराडा घातला. तू पहला पहला प्यार हैं मेरा, तुम हाे ताे सब आसान, काेई इतना खुबसुरत कैसे हाे सकता है, मैं चाहू तुझकाे बेपनाह, क्या मुझे प्यार है, तेरे दिल पे हक मेरा है अशी गाणी सादर करून तरुणाईच्या हृदयाला हात घातला. आयुष्यभर तुमच्यासाठी असेच गाणे तयार करत राहील असेही ताे आवर्जून म्हणाला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महाेत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ. प्रवीण दटके, अॅड. सुलेखा कुंभारे व महाेत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. khasdar-cultural-festival-2025 सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठण विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र रेणू अग्रवाल व मनाेज तत्ववादी यांच्याकडून नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आले. खासदार सांस्कृतिक महाेत्सव आयाेजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल साेले यांनी प्रास्ताविक केले. आयाेजनासाठी महाेत्सव समितीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नरत आहेत
हा महाेत्सव शहरासाठी सुंदर उपहार - देवेंद्र फडणवीस
स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना मंच देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंतांची कला बघण्याची संधी देणार खासदार सांस्कृतिक महाेत्सव हा शहराला मिळालेला सुंदर उपहार आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाेत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. khasdar-cultural-festival-2025 गीतेचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा महाेत्सव समितीने आयाेजित केलेल्या गीता पठण उपक्रमाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.