तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : मागील अनेक दिवसांपासून शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याच्या सभोवतालची वादग्रस्त जागा मोकळी करण्यासाठी आंदोलन सुरू होते. अखेर रविवार, 9 नोव्हेंबर रोजी आमदार किसन वानखेडे यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन तत्काळ अतिक्रमीत ठरणारी जागा मोकळी करा, असे पेट्रोलपंपाचे संचालक दिलीप सारडा यांना सांगितले.
यावेळी शहरातील अनेक नागरिक जमले होते. पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. वादग्रस्त असलेली जागा मोकळी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्यासभोवतालचा परिसर मोकळा होऊन शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सहजपणे मार्ग सुलभ होणार आहे. यामुळे वाढत चाललेल्या वादाला विराम मिळणार आहे.