चाकूहल्ला प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद

09 Nov 2025 19:39:02
शिरपूर जैन,
knife-attack-case : येथील मिर्झामिया उर्स यात्रे दरम्यान १ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्राणघातक चाकू हल्ला प्रकरणातील पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसया आवळल्या असून तिनही आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे.
 
 
k
 
शिरपूर येथे १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान मिझार्मीया उर्स यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. निमित्ताने १ नोव्हेंबर रोजी संदलची मिरवणूक निघाली होती. मिरवणूक बसस्थानक परिसरातून पुढे मुख्य मार्गाने शांततेत समोर गेली होती. मात्र, सायंकाळी साडेसातच्या दरम्यान येथील विशाल गोपाल देशमुख या तरुणावर बसस्थानाक परिसरात प्राण घातक चाकू हल्ला करण्यात आला होता. सदर तरुण हा सायंकाळच्या दरम्यान शेताकडे जाण्यासाठी दुचाकीवर निघाला होता. रस्त्याने गर्दी असल्याने त्याने त्याच्याकडील दुचाकीचा हॉर्न वाजविला. दुचाकीचा हॉर्न का वाजवल्या अशा किरकोळ कारणावरून तेथे असलेल्या सदर प्रकरणातील आरोपी व या तरुणासोबत वाद होवून या तरुणास बेदमपणे मारहाण करण्यात आली होती व पोटावर धारदार चाकूने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये तो गंभीर स्वरूपाचा जखमी झाला होता.
 
 
या प्रकरणी पोलिसांनी विशाल देशमुख याचा अकोला येथे जाऊन जबाब नोंदवला. सदरच्या जबाबदावरून पोलिसांकडून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान सदर प्रकरणी पोलिसांनी वाशीम येथील आरोपी शेख, अल्तमष शे. हकीम याला २ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तर, उर्वरित दोन आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद हुजैब मोहम्मद कलीम रा. वाशीम. याला ५ नोव्हेंबर रोजी तर, आरोपी शेख हकीम शेख रहीम रा. वाशीम याला ६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक केली असून, तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0